गडकोट किल्ल्यांचे संवर्धन झाले पाहिजे- साळशी येथील सुशांत पाटील यांचा देखावा
बांबवडे : साळशी तालुका शाहुवाडी इथं सुशांत संजय पाटील यांनी घरगुती गणपती सजावट मध्ये गडकोट किल्ल्यांचे होणारे विद्रुपीकरण थांबविण्याच्या हेतूने केलेले प्रबोधन, तसेच किल्ल्यांचे संवर्धन करण्याचे प्रबोधन देखाव्यातून दाखविण्यात आले आहे. त्यामुळे हा देखावा तालुक्यात सर्वात सुंदर देखावा आहे , अशी चर्चा पंचक्रोशीतून होत आहे.
संजय पाटील सामाजिक कार्यकर्ते यांनी हा देखावा घरगुती गणेशोत्सवात सादर केला आहे. या देखाव्याचे उद्घाटन तहसीलदार रामलिंग चव्हाण यांच्या हस्ते करण्यात आले.
या देखाव्यामध्ये छत्रपती शिवरायांनी ज्या कष्टाने किल्ले उभारले. त्याचे विद्रुपीकरण सध्याची तरुण पिढी पिकनिक स्पॉट म्हणून करीत आहे. सेल्फी स्पॉट म्हणून करीत आहे. हे थांबले पाहिजे. इथं होणारे मद्यसेवन, सिगारेट, अमली पदार्थ सेवन या गोष्टींना प्रतिबंध झाला पाहिजे. या हेतूने हा देखावा निर्माण करण्यात आला होता. टाकावू पासून टिकावू अशी प्रतिमा बनविण्यात आली होती.
यासाठी सुमारे तीन महिने मेहनत घेण्यात आली होती. आणि त्याचे फळ देखील सुशांत पाटील यांना मिळाले. घरगुती आरास स्पर्धेमध्ये १५६ स्पर्धकांतून या देखाव्याला प्रथम क्रमांक मिळाला आहे. त्याचे पारितोषिक सुद्धा मिळाले असून, सुशांत पाटील यांचे साप्ताहिक शाहुवाडी टाईम्स, एसपीएस न्यूज च्या वतीने हार्दिक अभिनंदन.