वाढदिवस हक्काच्या माणसाचा : विजयराव बोरगे पैलवान यांचा आज वाढदिवस
बांबवडे : बांबवडे जिल्हा परिषद मतदार संघाचे सदस्य विजयराव गंगाधर बोरगे ” आपला हक्काचा माणूंस ” यांना साप्ताहिक शाहुवाडी टाईम्स, व एसपीएस न्यूज परिवाराच्या वतीने उदंड आयुष्याच्या अनंत शुभेच्छा. दरम्यान काही अपरिहार्य कार्य कारणास्तव वाढदिवस सोहळा साजरा करण्यात येत नाही.
विजयराव बोरगे पैलवान हे जनसामान्यांचे नेतृत्व नेहमीच जनतेला भावलं. ” कोरोना ” च्या काळात त्यांनी रात्रीचा दिवस करून जनसामान्यांची सेवा केली. वाडी वस्तीवर जावून लोकांना त्यांनी सेवा दिली. त्यावेळी गरजेचे असलेले रेमडीसीवीर इंजेक्शन मिळवून देण्यासाठी अनेक प्रयत्न केले.
त्यानंतर भाडळे येथील शाहू कालीन पाणवठा, साळशी येथील ज्ञानमंदिर शाळा, त्यांनी घेतलेला वारकरी पंथासाठी, भजनी मंडळासाठी मोफत भजनी साहित्याचे वाटप या उपक्रमांनी निश्चित समाजातील जनतेमध्ये बोरगे पैलवान यांचे नाव कायमचे कोरले गेले आहे.
गणेशोत्सव काळात प्रत्येक सार्वजनिक गणेशोत्सव मंडळामध्ये आपली उपस्थिती दर्शविली. आणि बाप्पाला मोतीचूर लाडू प्रसाद म्हणून वाटप केले.
सर्व सामन्यांच्या सुख दु:खात खऱ्या अर्थाने सामील होणाऱ्या या व्यक्तिमत्वाने जनतेला आपल्या कार्य कर्तृत्वातून जनतेला आपलंस केले आहे.
अशा या व्यक्तिमत्वाने खऱ्या अर्थाने ” हक्काचा माणूंस ” म्हणून आपलं नाव कमावलं आहे.