शनिवार दि. ३० सप्टेंबर रोजी बांबवडे त ह.भ.प. श्री इंदुरीकर महाराज यांचा कीर्तन सोहळा
बांबवडे : बांबवडे तालुका शाहुवाडी येथील शिराळकर उद्योग समूह व संघर्ष तरुण मंडळ यांच्यावतीने गणेश चतुर्थी निमित्त ह.भ.प. श्री निवृत्ती महाराज देशमुख ( इंदुरीकर )महाराज यांच्या कीतर्नाचा सोहळा शनिवार दि.३० सप्टेंबर रोजी आयोजित करण्यात आला आहे.
हा कीर्तन सोहळा सायंकाळी ५ ते ७ असा असणार आहे. हा कार्यक्रम महात्मा गांधी विद्यालय बांबवडे येथील पटांगणावर आयोजित करण्यात आला आहे.
कीर्तनाला मृदुंगाची साथ महाराष्ट्र मृदुंग सम्राट संजू बाबा चिखलीकर देणार आहेत. गायनाची साथ स्वर गंधर्व श्री किरण महाराज शेटे, तसेच वारकरी भूषण श्री अभिषेक महाराज उंडाळेकर करणार आहेत.
या कीर्तन सोहळ्याचा लाभ सर्व भाविकांनी घ्यावा, असे आवाहन श्री दत्तात्रय यादव यांनी केले आहे.