सामाजिक विकास हीच आयुष्याची पर्वणी : संपत पाटील यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा
सरूड प्रतिनिधी : शिंपे तालुका शाहुवाडी येथील एक समाजशील व्यक्तिमत्व म्हणजे संपत आनंदराव पाटील हे होत. त्यांचा आज वाढदिवस आहे. समाजाच्या प्रगतीसाठी स्वत:च्या खिशाची पर्वा न करता, विकास उभा करण्याचा जमेल तेवढा प्रयत्न हे उमदं व्यक्तिमत्व करीत आहे. अशा या व्यक्तिमत्वाला सा. शाहुवाडी टाईम्स व एसपीएस न्यूज परिवाराच्या वतीने उदंड आयुष्याच्या अनंत शुभेच्छा.
शिंपे गावातील शैक्षणिक प्रगती ला पाठींबा देण्याचा नेहमीच हे व्यक्तिमत्व प्रयत्न करीत आलं आहे. गावातील खेळाडू यांची संख्या दिवसेंदिवस वाढावी, यासाठी ते नेहमी प्रयत्नशील असतात. गावात केवळ राजकारण न होता, समाजकारण घडलं पाहिजे, असा त्यांचा नेहमीच आग्रह असतो. गावातील बेरोजगार तरुणांना रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी देखील ते नेहमीच प्रयत्नशील असतात.
आज त्यांचा वाढदिवस. या दिवशी विरोधकांनी सुद्धा राजकारण संपवून गावाच्या हिताचं समाजकारण करावं. ” जे गाव करील, ते राव काय करील ? ” हे खोटं नाही. तेंव्हा समाजासाठी चांगलं कर्तुत्व त्यांच्या हातून घडावं, हेच त्यांना आशीर्वाद. पुनश्च वाढदिवसानिमित्त त्यांना खूप खूप शुभेच्छा.