अथायू मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल , व भारतीय जनता पक्ष शाहुवाडी संयुक्त विद्यमाने महाशिबीर संपन्न
मलकापूर प्रतिनिधी : मलकापूर तालुका शाहुवाडी इथं विधानसभा २७७ अंतर्गत महा आरोग्य शिबीर संपन्न झाले. यामध्ये ५० लोकांची तपासणी करण्यात आली.
अथायू मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल कोल्हापूर, व भारतीय जनता पक्ष शाहुवाडी यांच्या संयुक्त विद्यमाने या शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.
शाहुवाडी तालुक्यातील दुर्गम भागातील नागरिकांना मोफत एनजीओग्राफी, एनजीओप्लास्टी, बायपास, हृदयविकार, हाडांचे फ्रॅक्चर, गुडघ्याचे लीगामेंट शस्त्रक्रिया, कँसर ऑपरेशन, मेंदू व मणका ऑपरेशन, दुर्बिणी द्वारे मुतखडा, प्रोटेस्ट ऑपरेशन यासारखे सामान्य नागरिकांच्या आवाक्याबाहेर असणाऱ्या रोगाचे निदान व शस्त्रक्रिया मोफत करण्यात येणार आहे. उपस्थित रुग्णांच्या त्वरित मोफत इसीजी, रक्तातील साखर तपासणी करण्यात आली.
यावेळी डॉ. मुळीक यांचे स्वागत शाहुवाडी-पन्हाळा विधानसभा संपर्क प्रमुख प्रवीण प्रभावळकर यांनी केले. यावेळी उपस्थित भारतीय जनता पक्ष कोल्हापूर जिल्हा कार्यकारिणी, तालुकाध्यक्ष पांडुरंग वग्रे, विजय रेडेकर, अशोक देशमाने, सचिन पाटील, अनुराधा हिरवे, पुष्पा पास्ते व पदाधिकारी उपस्थित होते.