मतीमंद युवतीवर लैंगिक अत्याचार : आरोपीस अटक करण्यासाठी आज मलकापूर बंद
मलकापूर प्रतिनिधी : मलकापूर तालुका शाहुवाडी येथील मतीमंद युवती वर येथील अनिल गणपती भोपळे वय ५२ वर्षे रहाणार मलकापूर या संशयित आरोपीस अटक करावी, या मागणीसाठी आज मलकापूर मध्ये उत्स्फुर्तपणे बंद पाळण्यात आला.
मलकापूर शहर व पंचक्रोशीतील नागरिकांनी मलकापुरातून मूक मोर्चा काढला. या मोर्चामध्ये महिलांची संख्या लक्षणीय होती. मुकमोर्चाचे नेतृत्व सुद्धा महिलांनीच केले.
ओळखीचा गैरफायदा घेवून, गेली चार महिने संशयित अनिल भोपळे त्या युवतीवर लैंगिक अत्याचार करीत होता. या घटनेची तक्रार मुलीच्या आईने शुक्रवारी शाहुवाडी पोलीस ठाण्यात दिली. तरीदेखील संशयितास आजपर्यंत अटक न झाल्याने आज मलकापूर उत्स्फुर्तपणे बंद ठेवण्यात आले.
शनिवार, रविवार मलकापूर शहरात तणावाचे वातावरण आहे. रविवार सकाळी शिवाजी महाराज चौकात नागरिक व महिला यांनी जमून मूक मोर्चा काढला. संशयित आरोपी अनिल भोपळे यास अटक करावी, या मागणी चे निवेदन पोलीस निरीक्षक राजेंद्र सावन्त्रे यांना मोर्चेकऱ्यांनी दिले. पिडीत मुलगी हि गरीब आहे. तेंव्हा अशा पिडीतेला न्याय मिळणार का ? अशी मागणी देखील यावेळी करण्यात आली.