वीज नसताना, बॅटरी च्या प्रकाश झोतात प्रसूती ? : बांबवडे प्राथमिक आरोग्य केंद्र
बांबवडे : बांबवडे प्राथमिक आरोग्य केंद्र बांबवडे, तालुका शाहुवाडी इथं वीज नसताना, बॅटरी च्या प्रकाश झोतात प्रसूती करण्यात आली आहे. अशी माहिती विश्वसनीय सूत्रांकडून समजते.
याबाबत वैद्यकीय अधिकाऱ्याची स्तुती करावी, कि, आगावूपणा म्हणावा, अशी परिस्थिती निदर्शनास येत आहे. हि घटना गेल्या आठवड्यात घडल्याचे समजते. नव्हे तर जिल्ह्यात प्रथम असायचे.
बांबवडे प्राथमिक आरोग्य केंद्र काही वर्षांपूर्वी प्रसूती साठी तालुक्यात प्रथम असायचे, नव्हे तर जिल्ह्यात प्रथम असायचे. परंतु काही वर्षांपासून इथं नोंदविण्यात आलेल्या गर्भवती महिलांना बाहेर प्रसूती साठी पाठविण्यात येते. तेही खाजगी रुग्णालयात. हे कागदावर जरी रेफर करण्यात आले नसले,तरी या घटना घडताहेत, अशी माहिती विश्वसनीय सूत्रांकडून समजते.वीज नसल्याचे माहित असूनही, हि प्रसूती कशी करण्यात आली. याची चौकशी करण्यात यावी. अशी मागणी जनतेतून होत आहे.
दरम्यान प्राथमिक आरोग्य केंद्र सारख्या महत्वाच्या शासकीय ठिकाणाची वीज, हि वीजबील न भरल्यामुळे कापण्यात आल्याचे समजते. आरोग्याच्या महत्वाच्या ठिकाणचे वीजबील थकीत होणे. हीच मुळात आश्चर्याची बाब आहे. येथील प्रशासन नेमके करते काय ? असा प्रश्न सर्वसामान्य जनतेला पडला आहे. असे असतानाही तालुका वैद्यकीय अधिकारी याबाबत काय निर्णय घेतात ? हा प्रश्न महत्वाचा आहे.
दरम्यान बांबवडे येथील एका खाजगी रुग्णालयात, ग्रामीण रुग्णालय, तसेच इतर प्राथमिक आरोग्य केंद्राकडून गर्भवती महिला रेफर केल्या जातात. याबद्दल संबंधितांना त्यांचा मोबदला घरपोच मिळतो, असे देखील समजते. काही दिवसांपूर्वीच बांबवडे येथील स्वस्तिक हॉस्पिटल साठी जैविक कचरा इतरत्र टाकल्याबाबत ग्रामपंचायत बांबवडे कडून नोटीस पाठविण्यात आले होते. परंतु त्यावर कोणतीही कारवाई करण्यात आलेली नाही.
आरोग्याबाबत हलगर्जी केलेबाबत संबंधितांवर कडक कारवाई करण्यात यावी. अशी मागणी ग्रामीण जनतेतून करण्यात येत आहे.