लोकनेते फत्तेसिंगराव नाईक प्राथमिक विद्यामंदिर मध्ये हिंदी दिन संपन्न
शिराळा प्रतिनिधी : लोकनेते फत्तेसिंगराव नाईक प्राथमिक विद्यामंदिर चिखली तालुका शिराळा मध्ये १४ सप्टेंबर २०२३ रोजी हिंदी दिन मोठ्या दिमाखात संपन्न झाला. यादिवशी सर्व कामकाज हिंदी मध्ये संपन्न झाले.
यादिवशी विद्यार्थ्यांना हिंदी मध्ये व्याख्यान देण्यात आले. कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे देशभक्त आनंदराव बळवंतराव नाईक महाविद्यालय च्या हिंदी विभागाचे प्रमुख प्रा. सुनील गायकवाड सर होते.
कार्यक्रमाची सुरुवात सरस्वती देवी च्या प्रतिमेचे पूजन प्रमुख पाहुणे गायकवाड सर तसेच शाळेचे मुख्याध्यापक गवळी सर यांच्या हस्ते करण्यात आले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक सौ एम.डी. शिराळकर मॅडम यांनी केले. यावेळी हिंदी दिनाच्या शुभेच्छा देण्यात आल्या.
पाहुण्यांचे स्वागत विद्यार्थिनी अपेक्षा पाटील यांनी केले. विद्यार्थी श्रेया गायकवाड, प्रतीक्षा गायकवाड, नीरज कुरणे, अफनान सुतार, प्रसाद तळेकर, वृषभ पाटील, श्रेयस पाटोळे, अक्षरा पाटील, सृष्टी पाटील, निशिता कांबळे, जस्मिन मुल्ला, आराध्या गावडे, शुभम फारणे, प्रथमेश पाटील यांनी मनोगते व्यक्त केलीत.
यावेळी प्रमुख पाहुणे श्री गायकवाड सर यांनी हिंदी भाषेमध्ये महात्मा गांधी यांनी १४ सप्टेंबर १९४९ रोजी हिंदी भाषा प्रचलित करण्यासाठी प्रयत्न केले. याचे विवरण केले. हिंदी भाषेचे वाड्:गमय संत कबिरांचे दोहे, गुरु गोविंदसिंह यांचे विचार, हिंदी लेखक अमीर खुश्रो यांचे यांचे हिंदी काव्य सांगून विद्यार्थ्यांचे मनोरंजन केले, हिंदी चे महत्व पटवून दिले.
शाळेचे मुख्याध्यापक श्री गवळी सर यांनी हिंदी दिनाच्या शुभेच्छा देत, आपल्याला हिंदी मध्ये संवाद साधण्याचे आवाहन केले. कार्यक्रमाचे आभार शिक्षिका खराडे एस.ए., यांनी मानले. कार्यक्रमाचे आयोजन हिंदी विभागाच्या प्रमुख शिक्षिका आर.आर. पाटील यांनी केले.