लोकनेते फात्तेसिंग्रराव नाईक प्राथमिक विद्यामंदिर च्यावतीने पर्यटन दिन संपन्न
शिराळा प्रतिनिधी : शिराळा तालुक्यातील चिखली येथील लोकनेते फात्तेसिंग्रराव नाईक प्राथमिक विद्यामंदिर च्यावतीने ३० सप्टेंबर २०२३ दिनी पर्यटन दिन साजरा करण्यात आला.
पर्यटन दिन साजरा करण्यासाठी मल्लिकार्जुन येथे पर्यटन साठी शाळेतील विद्यार्थ्यांना नेण्यात आले. सकाळी पहिल्या सत्रात शाळेच्या सर्व मार्गीकेवरील चरण, फुफिरे, थेरगाव, मांगले येथील विद्यार्थ्यांना घेवून शाळेच्या बस मधून प्रवास करण्यात आला. पर्यटन च्या अनुषंगाने सुरुवात केलेला प्रवास वरूण राजाच्या साथीने करण्यात आला.
मल्लिकार्जुन देवस्थान च्या मंदिराच्या सुमारे ७०० ते ८०० पायऱ्या विद्यार्थ्यांनी छत्रपती शिवरायांच्या मावळ्यांच्या आवेशात सहज चढून जावून आपण सह्याद्रीचे वंशज आहोत, हे सिद्ध केले. श्री मल्लिकार्जुन देवस्थान च्या शांत वातावरणात परमेश्वराचे दर्शन घेतले. मंदिराच्या दक्षिणेला निसर्गाचा मनोरम्य सोहळा विद्यार्थ्यांना पाहता आला. त्यात आभाळात पाऊस आणि स्वच्छ वातावरण सर्वांनाच भावले.
मंदिर परिसरात शालेय प्रार्थना, ईशस्तवन, श्लोक आणि ओम नाम: शिवाय च्या जपाने वातावरण भक्तिमय झाले होते. दरम्यान इथल्या देवस्थान सह विद्यार्थ्यांना परिसराची माहिती देण्यात आली. या नंतर देवस्थान च्या बाजूला असलेल्या पीर दर्गा चे दर्शन घेतले. विठ्ठल मंदिराचे देखील विद्यार्थ्यांसह दर्शन घेण्यात आले. यानंतर देवस्थान हून पुन्हा पायऱ्या उतरून विद्यार्थ्यांसह सर्वजण खाली आले. यानंतर जेवण घेण्यात आले. यानंतर शिवपुरी येथील सिद्धेश्वराचे दर्शन घेण्यात आले.
अशापद्धतीने शैक्षणिक वर्ष २०२३-२४ च्या प्रथम सत्रातील परिसर भेट / पर्यटन दिन /शैक्षणिक क्षेत्र भेट शाळेचे मुख्याध्यापक श्री गवळी सर, तसेच सर्व शिक्षक वृंद, कर्मचारी वृंद, व चालक विभाग यांच्यासह पर्यटन भेट संपन्न झाली.