शासकीय वैद्यकीय अधिकाऱ्याने बांबवडे आरोग्य केंद्राचा बोजवारा उडवला ?: दोन महिने वीज बिलच भरले नाही
बांबवडे : बांबवडे प्राथमिक आरोग्य केंद्रातील शासकीय वैद्यकीय अधिकारी स्वत:ची मुजोरी समकक्ष कंत्राटी वैद्यकीय अधिकाऱ्यावर करीत असून, स्वत:ची सेवा सुद्धा त्याच कंत्राटी अधिकाऱ्याने करावी, अशी त्यांची अपेक्षा असते. आणि अशाप्रकारे गैरव्यवहार करणाऱ्या अधिकाऱ्याला, तालुका वैद्यकीय अधिकारी पाठीशी घालण्याचा प्रयत्न करीत आहेत.
दरम्यान बांबवडे येथील प्राथमिक आरोग्य केंद्राची वीज, वीज वितरण कंपनी ने कट केली असतानाही येथील कंत्राटी अधिकाऱ्याने आपली समाजाप्रती असलेली बांधिलकी जपत गर्भवती महिलेची बॅटरी च्या प्रकाशझोतात प्रसूती करीत आपले कर्तव्य पार पाडले. परंतु शासकीय वैद्यकीय अधिकारी उपस्थित असतानाही , त्यांनी याबाबत कोणतीही कारवाई केली नाही. येथील गेलेली वीज पुन्हा जोडण्यासाठी जि.प.सदस्य विजयराव बोरगे, सरपंच भगतसिंग चौगुले यांनी पुढाकार घेत प्रयत्न केले. आणि वीज पुरवठा पूर्ववत करण्यात आला.
याबाबत शासकीय वैद्यकीय अधिकारी यांना विचारणा करण्यासाठी पत्रकार मंडळी गेले असता, अधिकारी सुमारे ११.०० वाजेपर्यंत जागेवर नव्हते. असे निदर्शनास आले. याबाबत पत्रकार विचारणा करण्यासाठी गेले असता, त्यांच्याशी उद्धट वर्तन करण्यात आले. आणि पत्रकारांना तुम्ही बोलावले असा रोष ठेवून कंत्राटी वैद्यकीय अधिकाऱ्याला विनाकारण नोटीस काढण्यात आली. या प्रकरणाच्या पाठीशी तालुका वैद्यकीय अधिकारी असल्याचे समजते. शासकीय वैद्यकीय अधिकारी हे आपल्या कडे प्रसूती साठी आलेल्या महिलांना नाहक भीती घालून खाजगी रुग्णालयात पाठवतात. त्यासाठी खाजगी रुग्णालयाकडून त्यांना मोबदला दिला जातो. अशी चर्चा देखील रुग्णांकडून ऐकावयास मिळत आहे.
अशा अनेक तक्रारी शासकीय वैद्यकीय अधिकाऱ्याबाबत ऐकावयास मिळत आहेत. सदर मंडळींची उच्चस्तरीय चौकशी व्हावी, अशी मागणी जनतेतून होत आहे.