बांबवडे त ” गब्बर इज बॅक ” ? : ” स्वस्तिक हॉस्पिटल ” ची उच्च स्तरीय चौकशी ची मागणी
बांबवडे : बांबवडे तालुका शाहुवाडी येथील स्वस्तिक हॉस्पिटल प्रशासनाने मेडिकल चे बिल वाढविण्याकरिता पेशंट जिवंत असल्याच्या काळात म्हणजेच केवळ दीड तासात सुमारे १४ हजार रुपयांची औषधे वापरलीत, असा दावा केला आहे. केवळ दीड तासात झालेले बिल हे अवाजवी असून, सदर प्रशासनाची उच्च स्तरीय चौकशी व्हावी, अशा आशयाचे निवेदन शाहरुख नूरमुहम्मद मणेर यांनी प्रशासकीय अधिकाऱ्यांना दिले आहे.
शाहरुख यांनी दिलेल्या निवेदनात नमूद केले आहे कि, गुरुवार दि.१२ ऑक्टोबर २०२३ रोजी रात्री साडे नौ वाजनेच्या दरम्यान स्वस्तिक हॉस्पिटल मध्ये हृदयविकाराचा झटका आल्याने त्यांची आज्जी दुल्हनबी मणेर वय ८५ वर्षे यांना दाखल केले होते. दाखल करताच सुमारे सोळाशे रुपयांची औषधे आणण्यास सांगितली. ती आणून दिल्यानंतर रात्री ऑक्सिजन लावल्याचे सांगून, सुमारे चौदा हजारांची औषधे आम्ही रात्री दीड तासात वापरली असल्याचे सांगून पेशंट च्या नातेवाईकांकडून १६ हजारांचे बिल घेण्यात आले. दरम्यान आमची आज्जी तर रात्री साडे अकरा वाजेपर्यंत निधन पावली होती. या दरम्यान आम्ही आयसीयू मध्ये जाण्याचा प्रयत्न केला असता, त्यांनी आत येवू दिले नाही. यावरून आमच्या आज्जी चे निधन होवून सुद्धा केवळ पैसे उकळण्यासाठी हॉस्पिटल प्रशासनाने प्रेत अडवून ठेवले. आणि एकूण ३२ हजार रुपये बिल केले.
एकंदरीत हिंदी चित्रपटातील ” गब्बर इज बॅक ” शाहरुख च्या तक्रारीतून पुढे येतोय का ? असा प्रश्न सगळ्यांना पडला आहे.
दरम्यान या हॉस्पिटल बाबत जैव कचरा संदर्भात ग्रामपंचायत ने त्यांना नोटीस काढली होती. अशा अनेक तक्रारी आहेत, ज्या अद्याप समोर आलेल्या नाहीत. हॉस्पिटल नेमके कोणाचे आहे? हा प्रश्न सुद्धा अनुत्तरीत आहे. यामुळे सदर हॉस्पिटल ची उच्च स्तरीय चौकशी व्हावी, अशी मागणी केली जात आहे.