” काटा ” मारणाऱ्यांचा काटा काढणार – माजी खासदार राजू शेट्टी
बांबवडे : काटा मारणाऱ्यांचा काटा काढण्याची संधी आपल्याला लाभली असून, शेतकऱ्याच्या कष्टाला दाम मिळालाच पाहिजे. जागतिक बाजारपेठेत साखर सुमारे १००रु. किलो भावाने जाणार असेल , तर शेतकरी बंधूंना मागील गाळप हंगामात तुटलेल्या ऊसाला दुसरा ४००/- रुपयांचा हफ्ता साखर कारखान्यांनी दिला पाहिजे, अशी मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने करण्यात आली असून, त्यासाठी आक्रोश यात्रा काढण्यात आली आहे.
१७ ऑक्टोबर २०२३ रोजी आक्रोश यात्रा काढण्यात आली असून, ती पदयात्रा आज बांबवडे तलुका शाहुवाडी इथं पोहोचली. यावेळी उदय सह साखर कारखान्याच्च्या वतीने अथणी शुगर्स चे श्री रवींद्र देशमुख, प्रल्हाद पाटील, प्र. कार्यकारी संचालक भगवान पाटील यांनी माजी खासदार राजू शेट्टी यांनी दिलेले ४००/- रु. दुसऱ्या हफ्त्याची मागणी चे निवेदन बांबवडे एसटी स्थानका जवळ स्वीकारले.
यावेळी बोलताना राजू शेट्टी पुढे म्हणाले कि, जागतिक बाजारपेठेत साखरेचा तुटवडा भासत आहे. अशावेळी साखर चढ्या भावाने विकली जाणार आहे. परंतु कारखानदार यापैकी अधिकचा एकही रुपया शेतकऱ्याला देणार नाही. यासाठी शेतकऱ्यानेच कारखान्याच्या साखरेचे ट्रक अडवले पाहिजेत. जेणेकरून शेतकऱ्याला काही न काही रुपये मिळतील. असेही राजू शेट्टी यांनी सांगितले.
यावेळी बांबवडे ग्रामपंचायत च्या वतीने सरपंच भगतसिंग चौगुले व संचालक मंडळ यांनी राजू शेट्टी यांच्या आक्रोश यात्रेचे स्वागत केले. तसेच गणेश पाणी पुरवठा संस्था, निकम उद्योग समूह यांनी देखील राजू शेट्टी यांच्या यात्रेचे स्वागत केले.