देवापुढे दोन हात जोडण्यापेक्षा मदतीचा एक हात पुण्याचा – चेअरमन श्री उत्तमराव जाधव
बांबवडे : बांबवडे तालुका शाहुवाडी इथं साईनाथ मल्टीस्टेट को-ऑप. क्रेडीट सोसायटी लिमिटेड ची आठवी शाखा आज कार्यरत झाली असून, या अगोदर संस्थेच्या सात शाखा यशस्वीरीत्त्या कार्यरत आहेत. अशी माहिती चेअरमन श्री उत्तमराव जाधव यांनी पत्रकारांशी बोलताना दिली.
हि संस्था आपल्या सभासदांसाठी अनेक ठेव योजना घेवून शाहुवाडी तालुक्यात पदार्पित झाली आहे. देवापुढे दोन्ही हात जोडण्यापेक्षा मदतीसाठी पुढे केलेला एक हात अधिक पुण्यवान असतो, अशी चेअरमन श्री जाधव यांची श्रद्धा आहे. यातूनच समाजातील आर्थिकदृष्ट्या सबळ असणाऱ्यांची पुंजी आर्थिकदृष्ट्या दुर्बल असणाऱ्यांना सहकार्य करण्यासाठी वापरली जावी, यातून दोघानाही त्याचा मोबदला मिळतो, आणि समाज विकासात मोठा वाटा मिळाल्याचे पुण्य लाभते.
याच अनुषंगाने संस्थेने साई पेन्शन ठेव योजना, साईनाथ धनसंचय ठेव योजना, साई मुदत ठेव योजना, साई लखपती ठेव योजना, साई आवर्तक ठेव योजना ( आर.डी,) , साई उज्वल भविष्य ठेव योजना, साईनाथ दामदुप्पट ठेव योजना, शुभमंगल ठेव योजना, लेक माझी लाडकी ठेव योजना, ठेव तारण कर्ज योजना, साईनाथ वैद्यकीय सोनेतारण कर्ज योजना, साईनाथ सोने खरेदी कर्ज योजना, आदी योजना संस्थेने कार्यान्वित केल्या आहेत.
यावेळी माजी अर्थ व शिक्षण सभापती महादेवराव पाटील साळशीकर, विजय पाटील थेरगावकर, प्रकाश पाटील थेरगावकर, जिल्हा परिषद सदस्य विजयराव बोरगे पैलवान आदी मान्यवरांच्या हस्ते संस्थेच्या शाखेचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी बांबवडे पंचक्रोशीतील अनेक नागरिक उपस्थित होते.