ओरिजिनल स्पेअर पार्टस चे एकमेव हक्काचे ठिकाण म्हणजे एस.पी. स्पेअर पार्टस : खरेदीवर सुमारे २० टक्के डिस्काऊंट
शाहुवाडी तालुक्यातील बांबवडे – डोणोली मेन रोड दरम्यान असलेल्या संजयसिंह गायकवाड आयटीआय जवळ असलेल्या एस.पी. स्पेअर पार्टस च्यावतीने येणाऱ्या दीपावली निमित्त त्यांच्या ग्राहकांसाठी सुमारे १० ते २० टक्के डिस्काऊंट देण्यात येत असून, दोन टायर खरेदीवर ऑईल ची बॉटल फ्री देण्यात येत आहे. वेगवेगळ्या पार्टस वर वेगवेगळ्या प्रमाणात डिस्काऊंट असणार आहे. हि ऑफर दिवाळी पर्यत असणार आहे. अशी माहिती एस.पी. स्पेअर पार्ट चे मालक संजय पाटील यांनी एसपीएस न्यूज शी बोलताना दिली.
एस.पी. स्पेअर पार्ट सुमारे दहा वर्षे या दुचाकी स्पेअर पार्टस विक्री तसेच दुरुस्ती या व्यवसायात असून, त्यांनी चांगली प्रगती साधली आहे. ग्राहकांची विश्वासाहर्ता हेच आपले समाधान यावर त्यांनी आपला उत्कर्ष साधला आहे. या नवदाम्पत्याने आपल्या व्यवसायात परिश्रम घेत भांडवल वाढवले आहे. त्यांच्याकडे अनेक टायर कंपन्यांची डीलरशिप आहे. यामध्ये सिएट , एसजेआर टायर कंपन्यांची डीलरशीपआहे. तसेच टीव्हीएस कंपनीसह इतर टायर देखील उपलब्ध आहेत.
एस.पी. स्पेअर पार्टस मध्ये कोणत्याही दुचाकी चे पार्टस ओरिजिनल मिळतात. इथं ग्राहकांच्या विश्वासाशी कोणतीही तडजोड केली जात नाही.
इथं खरेदी केलेल्या ऑईल वर पॉलीश पाऊच फ्री मिळते. तुम्ही कोणतेही दोन टायर खरेदी केल्यास त्यावर एक ऑईल बॉटल फ्री देण्यात येत आहे.
तसेच विविध कंपनी च्या टू व्हीलर च्या बॅटरी सुद्धा आपल्याला खात्रीशीर दिल्या जात आहेत. यामध्ये अॅमरॉन सह इतर कंपन्यांच्या बॅटरी सुद्धा उपलब्ध आहेत.
२०१४ साली नोकरी च्या मागे न लागता संजय पाटील यांनी व्यवसायास सुरुवात केली. आणि आज ते यशाच्या उंबरठ्यावर उभे आहेत. संजय पाटील व त्यांची पत्नी असे दोघेही आपल्या व्यवसायात कष्ट करीत असून, त्यांचा त्याच्या व्यवसायावर पूर्ण विश्वास आहे. कोणत्याही प्रकारची ग्राहकाची फसवणूक होता कामा नये. यासाठी हे दाम्पत्य ग्राहकांचा विश्वास जोपासत आहेत. विक्री तसेच विक्री पश्चात सेवा हा त्यांचा मूलमंत्र आहे. ओरिजिनल स्पेअर पार्टस चे एकमेव हक्काचे ठिकाण म्हणजे एस.पी. स्पेअर पार्टस म्हणावयास हरकत नाही. अधिक माहितीसाठी मालक श्री संजय पाटील यांच्या ९८९०७२२११७ या क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन देखील करण्यात आले आहे.