मनसे च्या शाहुवाडी तालुका कार्यकारिणी च्या निवडी संपन्न
बांबवडे : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या शाहुवाडी तालुका कार्यकारिणीची निवड शाहुवाडी विश्रामगृह इथं करण्यात आली. मनसे चे नेते व अध्यक्ष श्री राजसाहेब ठाकरे यांच्या आदेशाने या निवडी संपन्न झाल्या.
मनसे चे संपर्क अध्यक्ष सर्व श्री जयराज लांडगे, जिल्हा अध्यक्ष गजानन जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली या निवडी संपन्न झाल्या. यावेळी शाहुवाडी तालुका अध्यक्ष पदी बाळासाहेब कदम, यांची निवड करण्यात आली. तसेच नूतन पदाधिकारी यांच्या सुद्धा निवडी करण्यात आल्या.
यावेळी बाळासाहेब कदम यांनी मार्गदर्शन पर मनोगत व्यक्त करताना आजीमाजी तसेच सर्व पदाधिकाऱ्यांचे आभार मानीत मनसे चे कार्य उद्दिष्ट पूर्ण करण्याचा संकल्प केला.
यावेळी नूतन पदाधिकाऱ्यांचा सत्कार समारंभ संपन्न झाला. यावेळी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मलकापूर शहर अध्यक्ष अजय गुरव यांनी केले. तसेच बांबवडे शहर अध्यक्ष विजय परीट, सहकार सेना जिल्हा उपाध्यक्ष सतीश तांदळे, विजय चिखलकर, तालुका उपाध्यक्ष कुणाल काळे यांनी मनोगते व्यक्त केलीत.
यावेळी राहुल पाटील, तुरुकवाडी, अतुल गावडे बांबवडे शहर उपाध्यक्ष, नागार्जुन पाथरवट शाखा अध्यक्ष बांबवडे, प्रवीण शिंदे शाखा उपाध्यक्ष सवते, ऋतिक सावंत शाखा अध्यक्ष शिरगाव, रितेश पोवार यांच्यासह मनसे चे कार्यकर्ते मोठ्या प्रमाणावर उपस्थित होते.