लोकनेते फत्तेसिंगराव नाईक प्राथमिक विद्यामंदिरात वेशभूषा स्पर्धा संपन्न
शिराळा प्रतिनिधी : सोमवार दिनांक 25/12/2023 रोजी लोकनेते फत्तेसिंगराव नाईक प्राथमिक शाळेत पारंपारिक वेशभूषा कार्यक्रम झाला. यावेळी शाळेतील अनेक विद्यार्थ्यांनी पारंपारिक वेशभूषा ,यांचे नेपथ्य उत्कृष्ट केले होते. त्यामधे त्यांनी साईबाबा , बाळू मामा, अहिल्याबाई होळकर, जिजामाता, भारतमाता, सैनिक, मावळा, शेतकरी , गवळण, मीराबाई, भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर, झाशीची राणी, कोळीण अशा अनेक वेशभूषा विद्यार्थ्यांनी परिधान केल्या होत्या.
कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी म्हणून देशभक्त आनंदराव बळवंतराव नाईक चिखली महाविद्यालयाच्या प्राध्यापिका. सौ. अंकितादेवी भूषण नाईक ( वहिनी ) या होत्या. यावेळी सर्व विद्यार्थ्यांच्या वेशभूषेची ओळख व त्या व्यक्तीचे कार्य याचा परामर्श घेतला. सर्व विद्यार्थ्यांचे त्यांनी कौतुक केले. या उपक्रमामुळे देशातील राष्ट्रीय ऐक्य , सामाजिक बांधिलकी , सर्वधर्म समभावाची संकल्पना दृढ होत असल्याचे व आपल्या सर्व परंपरा जपण्याचे महत्त्व विद्यार्थ्यांच्या लक्षात येऊन ते चिरंतन काळ टिकेल असे मत व्यक्त केले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक श्री. खबाले सर यांनी केले. आपले मनोगत आणि पाहुण्यांचे आभार श्री गवळी सर यांनी मानले. सूत्रसंचालन स्वप्नाली कांबळे यांनी केले. सर्व शिक्षकांनी कार्यक्रमाचे उत्कृष्ट नियोजन केले होते.