राजकीयसामाजिक

भाजप चा विकासकामांचा प्रसार रथ ओकोली इथं अडवला : भारतीय दलित महासंघ

बांबवडे : भारतीय जनता पक्षाच्या वतीने विविध योजनांची प्रसिद्धी करणारा रथ महाराष्ट्रभर फिरत आहे. तो रथ ओकोली तालुका शाहुवाडी इथं भारतीय दलित महासंघाचे तालुका अध्यक्ष आकाश कांबळे आणि कार्यकर्त्यांकडून अडविण्यात आला. तुमचा हा प्रसार असंविधानिक असून, तुम्ही तो आमच्या गावात तरी करायचा नाही. असे ठणकावून सांगितले, आणि रथ गावातून बाहेर नेण्यास भाग पाडले. हि घटना काल दि.४ जानेवारी २०२४ रोजी ओकोली इथं घडली.


दरम्यान या रथाविषयी भारतीय दलित महासंघाच्या वतीने तहसीलदार कार्यालयास या अगोदर दि.१५ डिसेंबर २०२३ रोजी निवेदन दिले होते. या निवेदनात त्यांनी म्हटले आहे कि, हा रथ केंद्र सरकार अथवा राज्य सरकार या नावाने प्रसार करीत असता, तरी हरकत नाही. परंतु विशिष्ट व्यक्ती च्या नावाने सरकार असे संबोधलेले डिजिटल लावून हा रथ फिरवला जात आहे. त्यामुळे तो असंविधानिक आहे. असे निवेदनात नमूद केले आहे. त्यानंतर तहसीलदार कार्यालयाकडून कोणतेही उत्तर संबंधितांना दिले गेले नाही. तरीही हा प्रसार रथ तालुक्यात फिरत आहे.


असाच तो ओकोली गावात आल्यानंतर भारतीय दलित महासंघाचे आकाश कांबळे यांनी तो रथ अडवला.आणि असंविधानिक प्रसार करण्यापासून संबंधितांना रोखले. अशी माहिती श्री आकाश कांबळे यांनी एसपीएस न्यूज शी बोलताना दिली.
दरम्यान या घटनेबाबत भारतीय जनता पार्टी चे तालुकाध्यक्ष पांडुरंग वग्रे यांच्याशी संपर्क साधला असता, सादर प्रसार रथयात्रेच्या परवानग्या अगोदरच दिल्या असून, ओकोलीत अडवलेली रथ यात्रा काही वेळातच पुन्हा मार्गस्थ झाली. हा शासकीय कार्यक्रम आहे असे त्यांनी सांगितले.


तसेच २७७ विधानसभा मतदारसंघाचे भाजप चे प्रमुख प्रवीण प्रभावळकर यांच्याशी संपर्क साधला असता, या केंद्रशासनाचा उपक्रम असून, जी जनता शासकीय उपक्रमाचा लाभ घेण्यापासून अजूनही वंचित आहे. अशा जनतेला तत्काळ त्यांची कैफियत ऐकून त्यांना त्या उपक्रमाचा लाभ दिला जातो. त्यामुळे इथं परवानगी मागण्याची गरजच नाही. शाहुवाडी पंचायत समिती अंतर्गत या योजना आहेत. त्यामुळे परवानगी ची गरजच नाही. असेही श्री प्रभावळकर यांनी सांगितले.

Mukund Pawar

Editor

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page

error: Content is protected !!