दवाखाने आणि हॉस्पिटल तपासणी साठी पथके कार्यरत – श्री. तहसीलदार रामलिंग चव्हाण
बांबवडे : शाहुवाडी तहसीलदार कार्यालयाच्या वतीने तहसील कार्यालय व आरोग्य विभाग यांची आठ संयुक्त पथके निर्माण करून तालुक्यातील दवाखाने, हॉस्पिटल यांची कागदपत्रे आणि नियम तपासणी करून अनधिकृत घडणाऱ्या घटनांवर अंकुश आणला जाईल, असे मत तालुक्याचे तहसीलदार रामलिंग चव्हाण यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले.
बांबवडे तालुका शाहुवाडी इथं घडलेली कारवाई आणि त्या अनुषंगाने तालुक्यातील जनतेचे आरोग्य जपण्यासाठी हि कारवाई करण्यात येत आहे. तालुक्यात अनेक बोगस डॉक्टर देखील कार्यरत असल्याचे कळते. यावर अंकुश आणण्यासाठी हि कारवाई असणार आहे. असेही तहसीलदार श्री रामलिंग चव्हाण यांनी सांगितले.