सरूड फाटा अपघातांचा ब्लॅक स्पॉट …
बांबवडे : आज दि.३ फ़ेब्रुवरि२०२४ रोजी दुपारच्या दरम्यान बांबवडे तालुका शाहुवाडी येथील सरूड फाट्यावर ट्रॅक्टर ची उसाने भरलेली ट्रॉली पलटी झाली. या दरम्यान रस्त्यावर चालणारी काही मंडळी थोडक्यात बचावली.
बांबवडे येथील सरूड फाटा हा अपघाताचा ब्लॅक स्पॉट ठरत आहे. बांबवडे इथं तालुक्यातील एकमेव असा उदय सह.साखर कारखाना आहे. इथं सरूड दिशेहून येणारी उसाची वाहने असतात. इथं तीव्र वळण असल्याने, इथं वारंवार ट्रॅक्टर ट्रॉली पलटी होण्याच्या घटना घडत आहेत. यामुळे पादचारी दगावण्याची शक्यता नाकारता येत नाही. यासाठी ट्रॅक्टर चालक गरजेपेक्षा अधिक वेगाने येत असतात, आणि तीव्र वळण घेतल्याने ट्रॉली पलटी होण्याच्या घटना घडत आहेत. याचबरोबर क्षमतेपेक्षा जास्त उस भरत असल्याने देखील ट्रॉली पलटी होण्याच्या शक्यता नाकारता येत नाही. तेंव्हा चालकांना सूचना देणे, याचबरोबर त्यांच्या वेगावर नियंत्रण आणणे, हि कारखान्याची तसेच पोलिसांची जबाबदारी असून, त्यांनी ती पूर्ण करावी, अशी मागणी जनतेतून होत आहे.