मैत्रीच्या नात्याला सामाजिक वसा लाभलेलं एक युवा पर्व म्हणजे भैय्यासाहेब – श्री संपत पाटील शिंपे
बांबवडे : आमचे मित्र व भेडसगाव तालुका शाहुवाडी ग्रामपंचायत चे माजी सरपंच श्री अमरसिंह हंबीरराव पाटील उर्फ भैय्यासाहेब यांना त्यांच्या वाढदिवसानिमित्त उदंड आयुष्याच्या अनंत शुभेच्छा, व्यक्त केल्या आहेत,त्यांचे मित्र संपत पाटील शिंपे यांनी. ते एस.पीएस. न्यूज शी बोलत होते.
यावेळी आपल्या मित्राबद्दल भावना व्यक्त करताना संपत पाटील म्हणाले कि, अमरसिंह हे व्यक्तिमत्व नेहमीच मैत्रीच्या धाग्यात गुंफलेलं असतं. मैत्री करताना देखील सामाजिक भान ठेवून असतं. सध्याच्या युगात प्रत्येकाला स्वत: बद्दल तसेच आपल्या मुलांबद्दल काळजी असते . माझा मुलगा / मुलगी डॉक्टर किंवा इंजिनिअर करण्यासाठी प्रत्येकजण झटत असतो. परंतु समाजातील मुलांबद्दल विचार करायला कोणाकडे वेळच नसतो. परंतु अमरसिंह हे व्यक्तिमत्व नेहमीच समाजाप्रती कृतज्ञ राहीलं आहे. कारण त्यांनी समाजातील स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करणाऱ्या मुलांसाठी पुस्तके उपलब्ध करून दिली आहेत.
अमरसिंह उर्फ भैय्या हे समाजातील युवा पिढीच्या नवनिर्माणासाठी नेहमीच सर्वस्व पणाला लावत असतात. अशा मैत्रीसाठी आमच्यासारखी मित्रमंडळी आपला जीव सुद्धा पणाला लावायला मागे पुढे पाहणार नाहीत. कारण गोरगरिबांच्या मुलांसाठी काहीतरी करण्याची त्यांची तळमळ आम्ही पहिली आहे. त्यातूनच आदर्श घेवून आम्हीसुद्धा फुल ना फुलाची पाकळी देण्याचा प्रयत्न करीत आहोत.
हे सर्व भैय्यासाहेबांच्या आदर्श व्यक्तीमत्वातून घेतलेला आदर्श आहे. आज त्यांच्या वाढदिवसानिमित्त आठवणींच्या सागराला उधाण आलं आहे. मैत्रीच्या नात्याला लाभलेलं हे वाण आहे. सामाजिक बांधिलकीचा हा वसा भैय्यासाहेबांकडून आम्ही घेतला असून, तो समाजातील तळागाळातील लोकांपर्यंत पोहाचविणे हीच भैय्यासाहेबांना त्यांच्या वाढदिवसानिमित्त दिलेली भेट असेल.
अमरसिंह पाटील उर्फ भैय्या साहेबांच्या या गोड प्रसंगी जिल्हा परिषदेचे माजी बांधकाम व आरोग्य सभापती हंबीरराव पाटील बापू, अजित पाटील आप्पा, सदाशिव पाटील, उदय पाटील, शिवाजी पाटील, माजी उपसरपंच बाबासाहेब पाटील, व सेवा संस्थेतील सदस्य यावेळी उपस्थित होते.