फत्तेसिंगराव नाईक विद्यालयाचे एन.एम.एम.एस. परीक्षेत धवल यश
शिराळा प्रतिनिधी : शिराळा तालुक्यातील चिखली येथील लोकनेते फत्तेसिंगराव नाईक प्राथमिक विद्यामंदिर च्या विद्यार्थ्यांनी एन.एम.एम.एस. परीक्षेत घवघवीत यास मिळवले आहे. विद्यालयाचा निकाल १०० % लागला आहे. तसेच या परीक्षेत तीन विद्यार्थिनींना सारथी च्या माध्यमातून शिष्यवृत्ती लाभणार आहे असा विश्वास विद्यालयाच्या वतीने व्यक्त करण्यात येत आहे.
या विद्यार्थिनींना सुमारे ४० हजार रुपये शिष्यवृत्ती मिळणार आहे. एन.एम.एम.एस. परीक्षेत कु. श्रेया पंदुरण गायकवाड हि १११ गुण मिळवून प्रथम आली आहे. अपेक्षा मोहन पाटील हिला ९७ तर प्रतीक्षा रंगराव गायकवाड हिला ९१ गुण प्राप्त झाले आहेत. सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे संस्थेचे अध्यक्ष म.श्री अमरसिंह नाईक (पापा ), शाळेचे मुख्याध्यापक श्री डी. पी. गवळी सर, वर्गशिक्षक, शिक्षकवृंद, शिक्षकेतर कर्मचारी वृंद यांच्याकडून अभिनंदन करण्यात येत आहे.
साप्ताहिक शाहुवाडी टाईम्स व एसपीएस न्यूज च्या वतीने देखील सर्व यशस्वी विद्यार्थ्याचे हार्डीक अभिनंदन.