राज्यस्तरीय कराटे स्पर्धे मध्ये फत्तेसिंगराव नाईक शाळेचे सुयश
शिराळा प्रतिनिधी : गोवा येथे झालेल्या राज्यस्तरीय कराटे स्पर्धे मध्ये चिखली तालुका शिराळा येथील लोकनेते फत्तेसिंगराव नाईक प्राथमिक विद्यामंदिर च्या विद्यार्थ्यांनी घवघवीत यश मिळवले आहे.
पृथ्वी माने सरूड हिने द्वितीय क्रमांक पटकावून सिल्वर मेडल प्राप्त केले आहे.
तनिष्का कांबळे मांगले, सरूड येथील श्लोक विभूते व समीक्षा माली वाडीचरण या तिघांनीही तृतीय क्रमांक मिळवत ब्रांझ मेडल पटकावले आहे
.
तसेच नेपाल येथे होणाऱ्या राष्ट्रीय कराटे स्पर्धेसाठी या चौघांची हि निवड झाली आहे. या चौघांचे हि विद्यालयाच्यावतीने अभिनंदन करण्यात येत आहे.
सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे संस्थेचे अध्यक्ष मा. श्री अमरसिंह नाईक ( पापा ), शाळेचे मुख्याध्यापक श्री डी. पी. गवळी सर, वर्गशिक्षक, शिक्षकवृंद, शिक्षकेतर कर्मचारी वृंद आदींच्या वतीने हार्दिक अभिनंदन करण्यात येत आहे.
साप्ताहिक शाहुवाडी टाईम्स, एसपीएस न्यूज च्या वतीने देखील यशस्वी विद्यार्थ्यांचे हार्दिक अभिनंदन .