प्रतिक काकडे यांना रसायन तंत्रज्ञान संस्थेकडून पीएचडी प्राप्त
शिराळा ; प्रतिनिधी
शिराळा येथील एका सुसंस्कृत, शिक्षणाचे महत्व जाणणाऱ्या काकडे कुटुंबातील सुपुत्र प्रतिक शैलेंद्र काकडे याने रसायन तंत्रज्ञान संस्था, माटुंगा – मुंबई (आय.सी.टी पूर्वीचे यू.डी.सी.टी) अशा संशोधनासाठी देशपातळीवरील अग्रेसर आणि जगप्रसिद्ध संस्थेमधून डॉक्टरेट (पी. एच. डी) पदवी फार्मास्युटिकल टेक्नॉलॉजी या विभागातून संपन्न केली आहे.
डॉ. प्रतिक, मुळचे नागपंचमीचे शिराळा येथील गुरुवार पेठ, येथील रहिवासी आहेत. लहानपणापासून कष्ट, जिद्द, चिकाटी आणि सतत प्रयत्नशील रहाणे, या गोष्टीचा पाठपुरावा करत आणि प्राप्त परिस्थितीत स्वतःला अग्रेसर ठेवत त्यांनी यशाचे उंच शिखर गाठले आहे.
वारणानगर मधील तात्यासाहेब कोरे कॉलेज ऑफ फार्मसी येथून त्यांनी ग्रॅज्युएशन आणि पोस्ट ग्रॅज्युएशन शिक्षण पूर्ण करून आय सी टी पूर्वीचे यु डी सिटी येथे फार्मासिटिकल सायन्सेस अँड टेक्नॉलॉजी या विभागामध्ये पीएचडी साठी ऍडमिशन मिळवले. पीएचडी मध्ये त्यांनी नॅनो टेक्नॉलॉजी चा वापर करून असा फॉर्मुला तयार केला आहे, ज्याच्यामध्ये औषधे आणि सौंदर्यप्रसाधने तयार करण्यासाठी कमीत कमी वेळ आणि कमीत कमी खर्चात नवीन मानव उपयोगी औषध आणि सौंदर्यप्रसाधन बाजारामध्ये आणता येईल. त्यांनी याच नॅनो टेक्नॉलॉजी चा वापर करून सूर्यासिस आणि फंगल इन्फेक्शन याच्यासाठी औषध तयार केले आहे. तयार केलेले औषध मानवी त्वचेवर काम करते आणि बाजारामध्ये उपलब्ध असलेल्या औषधांपेक्षा चांगल्या पद्धतीने काम करते . जे त्यांनी वेगवेगळ्या टेस्ट आणि ॲनिमल स्टडी यांच्यावर प्रयोग करून सिद्ध केले आहे. त्यांनी जो फॉर्मुला तयार केला आहे, त्या फॉर्मुल्याचे पेटंट ही मिळवले आहे. त्यांना या त्यांच्या पीएचडी साठी त्यांच्या गाईड डॉक्टर प्राचार्य वंदना भरत पत्रावळे यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले.
तसेच या कामासाठी त्यांना प्रधानमंत्री फेलोशिप मिळाली होती. मुंबईमधील एनक्यूब एथिकल्स प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीचे वेळोवेळी सहकार्य मिळाले. नॅनो टेक्नॉलॉजी वरील पेटंट पुढील काळामध्ये नवीन येणाऱ्या ड्रग मॉलिक्युल चा वापर करून नवीन औषधे वेगवेगळ्या त्वचारोगांसाठी होऊ शकतो. तसेच सौंदर्य प्रसाधने तयार करताना ही टेक्नॉलॉजी वापरात येऊ शकते. तसेच तयार केलेल्या या नवीन टेक्नॉलॉजीचा वापर त्वचारोग सोडून अजून वेगवेगळ्या मानवी रोगांसाठी वापरात यावा, यासाठी त्यांच्या संशोधन ग्रुप चा प्रयत्न पुढील काळामध्ये असणार आहे.
त्यांच्या या संपूर्ण प्रवासामध्ये त्यांच्या पीएचडी च्या मार्गदर्शक डॉक्टर पत्रावळे यांच्याबरोबर प्राचार्य डॉक्टर जॉन डिसूजा (वारणानगर) तसेच संपूर्ण काकडे कुटुंबीयांचे मोलाचे सहकार्य लाभले.