श्री यशवंत इंटरनॅशनल इंग्लिश अकॅडमी अँड प्रदीप पाटील ज्युनिअर कॉलेज चा वार्षिक स्नेह संमेलन सोहळा
बांबवडे : डोणोली तालुका शाहुवाडी येथील श्री यशवंत इंटरनॅशनल इंग्लिश अॅकॅडमी अँड प्रदीप पाटील ज्युनिअर कॉलेज चा वार्षिक स्नेह संमेलन सोहळा दि.२१ फेब्रीवारी २०२४ रोजी सायंकाळी ५.३० वा. संपन्न होणार आहे.ॅॅ
या कार्यक्रमास निवृत्त शौर्य गौरव पुरस्कार विजेते श्री नंदकुमार चावरे हे मुख्य अतिथी असणार आहेत. त्याचबरोबर निवृत्त सैन्य दलातील महाराष्ट्र गौरव पुरस्कार विजेते श्री प्रेमदास खरात हे असणार आहेत. यांच्यासोबत संस्थेच्या अध्यक्षा श्रीमती पद्मजा प्रदीप पाटील, संस्थेचे सचीव डॉ. जयंत पाटील, उपाध्यक्ष सौ. विनिता जयंत पाटील आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत.
कार्यक्रमाचे संयोजन प्राचार्य श्री सचिन जद सर यांच्यासोबत शिक्षकवृंद, शिक्षकेतर कर्मचारी वृंद तसेच विद्यार्थी आणि विद्यार्थिनी यांनी केले आहे.