बांबवडे त मध्यरात्री पुन्हा बिबट्या : उरलेल्या भक्ष्याचा फडशा
बांबवडे : बांबवडे तालुका शाहुवाडी इथ बिबट्याने केलेल्या हल्ल्यात पाळीव कुत्र्याचा फडशा पाडण्यात आला. यानंतर आज पहाटे पुन्हा बिबट्या अवतरला आणि उरलेल्या भक्ष्याचा फडशा पाडला. या घटनेमुळे ग्रामस्थांमधून घबराटीचे वातावरण निर्माण झाले आहे.
काल दि.३१ मार्च रोजी बांबवडे येथील उदय साखर कारखाना परिसरात शेतात असलेल्या घराजवळ बिबट्याने पाळीव कुत्र्याचा फडशा पाडला. बांबवडे हे गाव सुमारे दहा हजार लोकसंख्येचे गाव आहे. कारखाना परिसरात सुद्धा अनेक शेतकरी घरे बांधून रहात आहेत. आजवर इतर ठिकाणी वर्दळ कमी असलेल्या ठिकाणी बिबट्याने हल्ला केला होता. त्यामध्ये शेतकऱ्याचे केवळ आर्थिक नुकसान झाले. परंतु बांबवडे सारख्या ठिकाणी बिबट्याचे वावरने यामुळे ग्रामस्थांमधून घबराट निर्माण झाली आहे.
विशेष म्हणजे काल जिथे कुत्र्याची शिकार केली, आज त्याच ठिकाणी बिबट्या येवून त्याचे उरलेले भक्ष्य खावून जातो. यावरून वनविभागाने किती दक्षता घ्यावी , याचा निर्णय घेवून कार्यवाही करावी. अन्यथा आंदोलनाचा पवित्रा घ्यावा लागेल, असे मत सरपंच भगतसिंग चौगुले यांनी एसपीएस न्यूज शी बोलताना सांगितले