…पुन्हा एकदा आयुष्याच्या पेटवा ” मशाली “- श्री सत्यजित पतील आबा
बांबवडे : आपल्या मतदारसंघातील कड्याकपारीतून आलेल्या जनतेला मनापासून धन्यवाद. तुमचे प्रेम मतदानाच्या माध्यमातून मतपेटीत बंद करा.. यासोबतच आपल्या विरोधकांना कमी समजून चालणार नाही. यासाठी आपल्या कार्यकर्त्यांनो ” पुन्हा एकदा आयुष्याच्या पेटवा मशाली “, असे आवाहन महाविकास आघाडीचे शिवसेनेचे उमेदवार श्री सत्यजित पाटील आबा यांनी केले आहे.
सरूड तालुका शाहुवाडी इथं प्रचाराचा शुभारंभ करण्यात आला. यावेळी तालुक्यातील कार्यकर्ता आणि सामान्य जनता यांनी मोठ्या प्रमाणावर गर्दी केली होती. तसेच यावेळी कार्यकर्त्यांनी स्वयंस्फुर्तीने निवडणुकीसाठी आर्थिक योगदान देण्याचे काबुल केले, तर काहींनी दिले सुद्धा. यावरून मतदारसंघातून फार मोठा ओढा सत्यजित आबांच्या पाठीशी ठाम असल्याचे दिसून आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी आमदार बाबासाहेब पाटील सरुडकर होते. यावेळी केडीसिसी बँकेचे संचालक रणवीरसिंग गायकवाड आपल्या कार्यकर्त्यांसहित मोठ्या प्रमाणावर उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक हंबीरराव पाटील यांनी केले.
यावेळी केडीसिसी बँकेचे संचालक रणवीरसिंग गायकवाड म्हणाले कि, एकेकाळी स्व. गायकवाड साहेब यांच्या रूपाने तालुक्यात खासदारकी नांदत होती. भविष्यात सत्यजित आबांच्या रूपाने खासदारकी तालुक्यात येणार आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पुनीत झालेल्या या मातीत आजही तेवढीच राग जिवंत आहे. आमचा हा लाल मातीतील पैलवान निष्ठेशी बेईमानी करणाऱ्या उमेदवारांना अस्मान दाखवल्याशिवाय राहणार नाही.
यावेळी अध्यक्षस्थानावरून बोलताना माजी आमदार बाबासाहेब पाटील दादा म्हणाले कि, आपले कार्यकर्त्यांचे सत्यजित आबांवर असलेले प्रेम मतात रुपांतरीत झाल्याशिवाय राहणार नाही. आणि आपला सत्यजित आपल्याला संसदेत पाहायला मिळेल. यात शंका नाही.
यावेळी अॅड. विजयसिंह पाटील उत्रेकर, शिवसेना जिल्हाध्यक्ष संजय चौगुले, जिल्हा उपाध्यक्ष नामदेव गिरी, एन.डी. पाटील सावेकर, शामराव पाटील परखंदळे, आनंदराव भोसले वरेवाडी, तानाजी चौगुले महाराज, गुरव समाजाचे तालुकाध्यक्ष बाळासाहेब गुरव, जालिंदर पाटील रेठरेकर, सुरेश पारळे, आदी जनांनी मनोगते व्यक्त केलीत. यावेळी विजय लाटकर, विशाल साठे, अमरसिंह पाटील, संपत पाटील,व त्यांचे कार्यकर्ते, महिला आघाडी च्या अलका भालेकर, डॉ. स्नेहा जाधव, जानकी कुंभार, पूनम भोसले या महिला देखील कार्य्कार्त्यांसाहित मोठ्या संख्येने उपस्थित होते.