संपादकीयसामाजिक

मराठी माणूस मुंबई बाहेर घालवणार का ?: वैचारिक चळवळीची गरज

बांबवडे : मुंबई इथं मराठी लोकांना नोकरी नाकारणाऱ्या घटनेची बाब महाराष्ट्राला विचार करायला लावणारी आहे. महाराष्ट्राच्या अस्मितेला भविष्यात धक्का लागणार का ? असा प्रश्न निर्माण होवू लागला आहे.


मुंबई हि महाराष्ट्राची आर्थिक राजधानी आहे. हि महाराष्ट्रापासून तोडण्याचे अनेक प्रयत्न झाले, परंतु इथल्या मराठी माणसाने दिलेला निकराचा लढा, यामध्ये अनेक जणांनी हौतात्म्य पत्करलं आणि मुंबई महाराष्ट्रापासून तोडण्याची स्वप्ने धुळीस मिळवली. हा झाला इतिहास . परंतु आजही काही समाज मराठी माणसाला नाकारताना दिसत आहे. यामुळे इतिहासातील मराठी द्वेष्टि विषवल्ली आजही जिवंत आहे का ? असा प्रश्न पुन्हा एकदा मराठी माणसाच्या समोर येवू लागला आहे.


नुकत्याच एका कंपनीने मराठी लोकांना क्षमता असतानाही नाकारण्याची घटना समोर आली आहे. पूर्वी इंग्रजांच्या काळात Indian are not allowed. अशी सूचना त्यांच्या हॉटेल्स च्या बाहेर लावलेल्या असायच्या, अस इतिहास सांगतो. यावरून इंग्रज बरे असे म्हणता येईल का ? कारण या सूचना ते लोक त्यांच्या देशात लावत होते. परंतु सध्याची मंडळी आपल्याच मुंबई त राहून मराठी माणसाला नाकारणे, म्हणजे संताप येण्यासारखे आहे. याबाबत राज्यकर्त्यांना सोयर सुटक नाही. पण मराठी माणसाने याकडे दुर्लक्ष करून चालणार नाही.


या अगोदर मुंबई येथील एका मराठी महिलेला एका सोसायटी त कार्यालय नाकारताना समोर आले होते. त्यावेळी मनसे ने आवाज उठवून त्या सोसायटीला चांगले च सुनावले. परंतु त्या सोसायटी विरुद्ध काही कायदेशीर कृती झाल्याचे ऐकिवात नाही. या घटना म्हणजे पुन्हा एकदा महाराष्ट्र एकीकरण चळवळ उभी करण्याची तयारी करावी लागणार का? असा प्रश्न अनाहूत पणे समोर येवू लागला आहे. यामध्ये एक समाज नेहमीच मराठी माणसाच्या द्वेषाने पछाडलेला असल्याचे इतिहासातून समोर येत आहे. परंतु ज्या राज्यात आपण राहतो ,त्याच्या विरुद्ध उभे ठाकणे म्हणजे देश द्रोह नाही का ? हा देश द्रोह सदरच्या समाजासोबत असणाऱ्या मराठी माणसाला विचार करायला लावणारा आहे. याचा त्यांनी जर विचार केला नाही, तर मराठी माणसाला हि बाब विचार करायला लावणारी आहे. जो समाज आमच्या महाराष्ट्रात राहतो, तो आमच्याविरोधातच कारवाया करत असेल तर एक वैचारिक चळवळ उभी राहणे एक काळाची गरज आहे. यावर गांभीर्याने विचार केला पाहिजे.

Mukund Pawar

Editor

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page

error: Content is protected !!