चरण येथे गवा रेड्यांचे दर्शन
बांबवडे (प्रतिनिधी) : बांबवडे पंचक्रोशी गेल्या महिन्यात बिबट्यांचे दर्शन ग्रामस्थांना झाले त्यानंतर आज पुन्हा एकदा गवा रेड्यांचे दर्शन आपल्याला चरण तालुका शाहुवाडी येथील वास्कर शेतामध्ये झाले. यावेळी श्री सागर पाटील आणि त्यांचे सहकारी यांनी गौरड्यांना पाहिले.
यादरम्यान संबंधित घटनेची माहिती वनक्षेत्र अधिकाऱ्यांना देण्यात आली. यावेळी वनक्षेत्र रक्षक श्री शंकर लवटे आणि सहकारी यांनी घटनास्थळाला भेट दिली. दरम्यान या गवा रेड्यानी ऊस पिकाचे अधिक नुकसान केल्याचेही समजते.
एकंदरीत काय ज्या क्षेत्रात बिबट्या गवा रेडा यांचा या अगोदर कधीही वावर पाहायला मिळाला नव्हता. या बाबत आता इथे ग्रामस्थांना दिसू लागला आहे. यामुळे पंचक्रोशीतून वातावरण निर्माण होत असल्याचे समजते.