धैर्यशील माने पुन्हा एकदा खासदार : आमदार कोरे यांच्या प्रयत्नांना यश
बांबवडे :हातकणंगले लोकसभा मतदारसंघात शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार धैर्यशील माने यांचा चुरशीच्या निवडणुकीत पुन्हा एकदा विजयाकडे शाश्वातपणे वाटचाल सुरु असून, त्यांचा विजय सुमारे १४ हजारांच्या वर मताधिक्य मिळवत, निश्चीत होत असल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांकडून मिळत आहे. एकंदरीत खासदार धैर्यशील माने यांच्या विजयात विद्यमान आमदार डॉ. विनय कोरे, आणि गोकुळ चे संचालक कर्णसिंह गायकवाड ,तसेच तालुक्यातील डॉ. कोरे यांचे खांदे समर्थक सर्जेराव पाटील पेरीडकर यांचा सिंहाचा वाटा आहे.
धैर्यशील माने यांच्या कार्यकर्त्यांनी जल्लोष सुरु केला आहे. त्यांचा आनंद सबुरीने मिळाला आहे.