बोरपाडळे येथील डंपर च्या धडकेत जाधववाडी येथील पती-पत्नी ठार
बोरपाडळे प्रतिनिधी : कोल्हापूर रत्नागिरी महामार्गावर बोरपाडळे हॉटेल इथं महामार्गावर काम करणाऱ्या डंपर ने थांबलेल्या दुचाकी स्वारासह त्याच्या पत्नीला जोराची धडक दिल्याने दोघेही पती-पत्नी यांचा जागीच मृत्यू झाला आहे. हि घटना आज दि. ८ जून रोजी सकाळी अकरा वाजनेच्या दरम्यान घडली असून, डंपर चालकास कोडोली पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
घटनास्थळाहून मिळालेली माहिती अशी कि, रत्नागीरी – नागपूर महार्गावर माती ओढणाऱ्या डंपर चालकाचा वाहनावरील ताबा सुटल्याने बोरपाडळे हॉटेल इथ रस्त्याच्या बाजूला उभ्या असलेल्या दुचाकी चालक मारुती रामचंद्र महाजन वय ५७ वर्षे, त्यांची पत्नी सुगंधा मारुती महाजन वय ५० वर्षे, राहणार जाधववाडी तालुका शाहुवाडी यांना धडक देवून, डंपर पुढे जावून चार चाकी वाहनाला धडकला . यामध्ये रस्त्याच्या बाजूला असलेला विजेचा खांब वाकला. त्याच्या तारा तुटल्या, आणि त्या मारुती महाजन दाम्पत्याच्या भोवती गुंडाळल्या. हा अपघात किती भीषण होता, हे या घटनेवरून लक्षात येते.
यानंतर विद्युत वितरण कंपनी चे कर्मचारी घटनास्थळी पोहचले . त्यांनी विद्युत प्रवाह बंद करून, मृतदेहा भोवती गुंडाळलेल्या तारा तोडून मृतदेह बाजूला काढले. दरम्यान कोडोली पोलीस ठाणे व महामार्ग पोलीस पथकातील पोलीस कर्मचारी यांनी घटनास्थळी भेट दिली. बघ्यांची गर्दी बाजूला करून मृतदेह उत्तरीय तपासणी साठी शासकीय रुग्णालयात पाठविण्यात आले. यावेळी संजीवनी मेडिकल कॉलेज चे विद्यार्थी यांनी सुद्धा घटनास्थळी येवून मदत केली. अपघाताची माहिती कळताच अप्पर पोलीस अधीक्षक जयश्री देसाई यांनी घटनास्थळी भेट दिली.
सदर घटनेची नोंद कोडोली पोलीस ठाण्यात झाली आहे.