राजकीयसामाजिक

माझ्या विजयात सत्यजित देशमुखांचा मोलाचा वाटा-खा.धैर्यशील माने

शिराळा प्रतिनिधी :-
माझ्या विजयामध्ये मोलाचा वाटा भाजपा नेते सत्यजित देशमुख यांचा असून, शिराळा विधानसभा मतदार संघामध्ये मिळालेला मोठा जनाधारामुळे विजयश्री खेचू शकलो. असे प्रतिपादन हातकणंगले लोकसभा मतदार संघाचे महायुतीचे विजयी उमेदवार खा.धैर्यशिल माने यांनी केले.


हातकणंगले लोकसभा निवडणुकीत महायुतीचे उमेदवार माने यांचा सत्कार भाजपा नेते, हातकणंगले लोकसभा मतदार संघ भाजपा प्रमुख सत्यजित देशमुख यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी ते बोलत होते.


यावेळी खा.धैर्यशिल माने म्हणाले, लोकसभा निवडणुकी मध्ये महायुतीच्या कार्यकर्त्यांनी मोठ्या ताकदीने काम केले. त्यामुळे विजयश्री मिळाली. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना समर्थन देण्याचे भाग्य जनतेच्या आशीर्वादाने मला मिळत आहे. या निवडणुकीत सर्व नेत्यानी चांगले काम केले. सांघिक काम झाल्याने यश मिळाले आहे. माझ्या विजयामध्ये सर्वात मोठे श्रेय शिराळा मतदार संघाचे असून सत्यजित देशमुख, सदाभाऊ खोत, राहुल महाडीक,सम्राट महाडीक,यांचे मोठे सहकार्य झाले. शिराळा मतदार संघाच्या सर्वागिण विकासाठी काम करणार असल्याची ग्वाही खा. माने यांनी दिली.


यावेळी माजी जिल्हा परिषद सदस्य संपतराव देशमुख, भाजपा तालुका अध्यक्ष हणमंतराव पाटील, युवा नेते रणजितसिह नाईक, माजी जिल्हा सदस्य के. डी. पाटील, बहादूरवाडी उपसरपंच भोजराज घोरपडे, सुनिल पाटील, सदाशिव पाटील, संदीप कदम, सूर्यकांत शिंदे, महेंद्र पाटील, राहुल चंने, अजित लादे, आदी मान्यवर उपस्थित होते.

Mukund Pawar

Editor

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page

error: Content is protected !!