मानवी जीवनासाठी पर्यावरण समतोल गरजेचा-श्री विराज नाईक
शिराळा (प्रतिनिधी) : मानवाच्या सुसह्य जीवनासाठी पर्यावरणाचा समतोल राखणे गरजेचे आहे, असे प्रतिपादन विश्वासराव नाईक सह. साखर कारखान्याचे संचालक विराज नाईक यांनी केले.
चिखली (ता. शिराळा) येथील कारखाना कार्यस्थळावर जागतिक पर्यावरण दिनाच्या निमित्ताने ते बोलताना पुढे म्हणाले, वाढते प्रदूषण व तापमानाचा मानवी जीवनावर विपरीत परिणाम होत आहे. पूर्वीची जंगलांची संख्या कमी झाली आहे. माणसाने सिमेंटची घरे, बंगले, मोठमोठ्या इमारती बांधत असताना झाडे, डोंगर यांची मोठ्या प्रमाणात हानी केली आहे. त्या प्रमाणात वृक्षारोपण व्हायला हवे होते, पण ते झालेले नाही. काळाची गरज ओळखून वृक्षारोपनाने ही पोकळी भरून काढावी लागणार आहे. शिवाय प्लास्टिकचा सुरू असलेला वारेमाप वापर कमी करणे गरजेचे आहे.
प्रारंभी संचालक श्री. नाईक यांचे हस्ते पिंपळ, चिंच, लिंब, मेडसिंग, करंज, जांभळ या प्रजातीच्या वृक्षांची लागवड करण्यात आली. यावेळी कारखान्याचे कार्यकारी संचालक अमोल पाटील, सचिव सचिन पाटील, मुख्य लेखाधिकारी भानुदास पाटील, शेती अधिकारी आनंदराव पाटील, राजेंद्र पाटील, दिनकर महिंद, प्रकाश पाटील, संदीप पाटील, संजय नाईक, प्रकाश पाटील, शंकर येवले, शिवाजी इंगवले, आनंदा डिसले, महादेव पाटील, संदीप पाटील, विजय देसाई, शरद पाटील व पर्यावरण विभागाचे व कारखाना कर्मचारी उपस्थिती होते.