शिराळ्यातील महायोगी गोरक्षनाथ महाराजांची पायी दिंडी पंढरपूर कडे रवाना
शिराळा (प्रतिनिधी):शिराळ्यातील महायोगी गुरु गोरक्षनाथ महाराजांची पायी दिंडी गुरुवारी शिराळा शहरात मिरवणूक काढून पंढरपूरच्या दिशेने रवाना झाली. शिराळा शहरांमधील नागरिकांनी दिंडी मार्ग तील घरांच्या समोर रांगोळी काढत पुष्पवृष्टी करत दिंडीचे जोरदार स्वागत केले. 

प्रारंभिक गोरक्षनाथ मठामध्ये मठाधिपती पीर पारसनाथ जी महाराज यांच्या हस्ते या पायी दिंडीचा शुभारंभ करण्यात आला. पंढरपूरला रवाना होण्यापूर्वी शिराळा शहरातून मिरवणूक काढण्यात आली. शहरातील प्राध्यापक कॉलनी येथे निवासस्थानी माजी राज्यमंत्री शिवाजीराव नाईक, माजी जिल्हा परिषद सदस्य रणधीर नाईक, व कुटुंबीयांनी पायी दिंडीचे स्वागत केले. या दिंडीचे स्वागत भाजपा नेते सत्यजित देशमुख, राष्ट्रवादी युवक काँग्रेस शरदचंद्र पक्षाचे जिल्हाध्यक्ष विराज नाईक, आपला बाजारचे अध्यक्ष सौ सुनीतादेवी नाईक, युवा नेते पृथ्वीसिंग नाईक, अभिजीत नाईक, सौ सुनंदा नाईक, सत्यजित नाईक व कुटुंबीय नगरसेविका सौ सीमा कदम, विजय महाडिक , संतोष हिरुगडे, स्वप्निल निकम ग्रामस्थांनी मोठ्या उत्साहात दिंडीचे स्वागत केले.

या पायी दिंडीमध्ये तालुक्यातील गोरक्षनाथ मठाचे पुजारी आनंदनाथ महाराज व भक्तगण सहभागी झाले होते.