इंदौर येथील अपघातात चार जन ठार :दिलदार तांबोळी बांबवडे येथील रहिवाशी
बांबवडे : शाहुवाडी तालुक्यातील बांबवडे येथील दिलावर फोटो स्टूडीओ चे मालक दिलदार तांबोळी यांच्यासहित मध्यप्रदेश इंदौर जवळील राजगद येथे झालेल्या अपघातात तीनजण जागीच ठार झाले, तर बांबवडे येथील दिलदार तांबोळी यांचा आज पहाटे उपचार घेत असताना मृत्यू झाला आहे. सदर ची माहिती घटनास्थळावरून उपलब्ध झाल्यानुसार मिळत आहे. अपघातात दुर्दैवी निधन झालेल्यांबद्दल साप्ताहिक शाहुवाडी टाईम्स व एसपीएस न्यूज च्या वतीने भावपूर्ण श्रद्धांजली .
याबाबत सविस्तर हकीकत अशी कि, येथील दिलदार तांबोळी यांच्यासहित पिशवी येथील अनिल पाटील, तासगाव सांगली येथील हमजीखान आत्तार , सांगली येथील भगवान पोवार दाम्पत्य कामानिमित्त मध्यप्रदेश इथं गेले होते. येताना आयोध्या येथील श्रीरामाचे दर्शन घेवून परत येत असताना, राजगड इथं रस्त्याशेजारी उभ्या राहिलेल्या कंटेनर ला कार ने मागून जावून धडक दिली.
हा अपघात एवढा भीषण होता कि, कार बाहेर काढताना जेसीबी मशीन चा वापर करावा लागला. या अपघातात पोवार दाम्पत्य, हमजीखान आत्तार ( तासगाव ) हे जागीच ठार झाले. तर आज पहाटे उपचार घेत असताना दिलावर फोटो स्टूडीओ चे चे मालक दिलदार तांबोळी वय (६३ वर्षे अंदाजे ) राहणार बांबवडे यांचा मृत्यू झाला आहे. पिशवी येथील अनिल पाटील गंभीर जखमी झाले असून उपचार सुरु kआहेत. अशी माहिती मिळत आहे.