मुलांच्या विरहाने माऊली ने देखील देह ठेवला : कोपार्डे घटना
मलकापूर प्रतिनिधी (रोहित पास्ते ) : बुधवार दि.३ जुलै रोजी शेतात विजेचा शॉक लागून मरण पावलेल्या दोन तरुणांच्या माऊली ने देखील घेतला अखेरचा श्वास.
कोपार्डे तालुका शाहुवाडी येथील दोन तरुण भावांचा शेतात विजेचा शॉक लागून मृत्यू झाला. हा धक्का विजेच्या धक्क्यापेक्षा देखील त्या माऊली ला मोठा होता. नंदाताई कृष्णा पाटील (वय ६० वर्षे ) यांचा विरहाने मृत्यू झाला. हि गोष्ट आई आणि मुलं यांच्यातील प्रेमाची तीव्रता दर्शवते. आई या दोन अक्षरी शब्दात अवघं ब्रम्हांड साठवलेलं असतं, असं म्हणतात ते काही उगाच नाही. मुलांच्या निधनानंतर अवघ्या तीन दिवसात माउली ने देखील आपला देह ठेवला.
एकंदरीत कृष्णा पाटील यांचं कुटुंब दुखाच्या डोंगराखाली घुसमटत आहे. याला कारणीभूत कोण ? याचा निवाडा होणे, हि काळाची गरज आहे. घरातील कर्ती मुलं अचानक निधन पावल्यानंतर काय काय घडू शकतं, हेच यावरून दिसून येत.
दरम्यान मोठा मुलगा सुहास याला एक लहान मुलगी आहे. त्या चिमुकल्या जीवाला हे कठोर सत्य अद्याप उमगलं देखील नसेल. वीज वितरण कंपनी आर्थिक भरपाई देतील सुद्धा. पण ह्या दु:खाच्या डोंगराचे काय ?, त्या माउली ला जो देह विरहाने ठेवावा लागला, त्याचे काय? या प्रश्नांची उत्तरे वीज कंपनी देवू शकेल काय ? हा प्रश्न तालुक्यातील सर्व सामान्य जनतेला पडला आहे. तसेच तो अधिकारी वर्गाला देखील पडला असेल. यामुळे संबंधित मंडळींवर कठोर कारवाई व्हावी, हीच जुजबी अपेक्षा येथील जनता करीत आहे.