शाहुवाडी-बांबवडे पोलिसांचा स्विफ्ट च्या मागे थरारक पाठलाग…
बांबवडे : शाहुवाडी – बांबवडे पोलिसांनी एका स्विफ्ट डिझायर चा थरारक पाठलाग केला असून, त्यांची मोहीम अजूनही सुरु आहे. हि घटना बांबवडे इथ ७ वाजण्याच्या दरम्यान घडली. दरम्यान त्या स्विफ्ट मधील एका इसमाला पोलिसांनी ताब्यात घेतले असल्याचे समजते.
मलकापूर तालुका शाहुवाडी दिशेहून बांबवडे च्या दिशेकडे स्विफ्ट डिझायर गाडी भरधाव वेगाने आली. दरम्यान बांबवडे पोलीस ठाण्यातील कर्मचाऱ्यांनी फाटक किराणा मर्चंट समोर बॅरिकेट लावून गाडी थांबवण्याचा प्रयत्न केला. परंतु गाडीतील लोकांनी बॅरिकेट लांबूनच पाहिले, आणि गाडी जाग्यावर फिल्म स्टाईल ने वळवली. त्यामागून बांबवडे येथील पोलीस गाडीने पाठलाग सुरु केला. ती गाडी पाटणे फाट्यावरून आत जावून सरूड रस्त्याला लागली. त्यापाठोपाठ पोलीस गाडी चा पाठलाग सुरु झाला. अद्याप ती गाडी पोलिसांच्या हाती लागलेली नाही.
दरम्यान मलकापूर इथून मिळालेल्या माहितीनुसार स्विफ्ट डिझायर मधील लोकांनी शाळी नदी च्या पुलावर वाहतुकीची कोंडी झाली होती. त्यावेळी इको गाडीतील लोकांशी स्विफ्ट मधील लोकांचा वाद झाला. त्यांनी इको गाडी फोडली. आणि पळून गेलीत. दरम्यान त्यापैकी एकाला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
एकंदरीत शाहुवाडी आणि बांबवडे पोलिसांनी मात्र जिगरबाज पाठलाग केल्याचे बांबवडे इथं दिसून आले.