बिबट्याच्या हल्ल्यात रेडकू ठार
शिराळा प्रतिनिधी (संतोष बांदिवडेकर):भैरववाडी ( ता शिराळा ) येथील दत्तात्रेय नारायण खराडे यांच्या जनावराच्या गोठ्यात शनिवारी मध्यराञी तीन वर्षाच्या रेडकावर बिबट्याने हल्ला करून ठार केले .
हि घटना रविवारी सकाळी निदर्शान आली . दत्तात्रेय खराडे यांचे घराशेजारीच जनावरांचे शेड आहे . दत्तात्रेय यांच्या पत्नी नेहमी प्रमाणे सकाळी जनावरांच्या गोठ्यात गेल्या असता त्यांना एक रेडकू रक्ताच्या थारोळ्यात दिसले . रेडकाला ओढून नेताना रेडकाची दोरी तुटली नसल्याने जागीच रेडकाला अर्धवट खाल्याचे निदर्शनास आहे.
या घटनेची माहिती पोलीस पाटील जयवंत बोबडे यांनी शिराळा वनविभाग यांना दिली. घटनास्थळी शिराळा वनविभाग वनरक्षक स्वाती कोकरे यांनी घटनेनी पाहणी करून हा हल्ला बिबट्याने केला असल्याचे सांगण्यात आले. टाकवे पशुवैद्यकीय कर्मचारी दगडू कुंभार यांनी पंचनामा केला. यात शेतकऱ्याचे अंदाजे दहा हजाराचे नुकसान झाले. या घटनेमुळे भैरववाडी परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.