शिराळा तालुक्यातील पुढील आमदार भाजपचा – श्री सत्यजित देशमुख
शिराळा प्रतिनिधी :-
भारतीय जनता पक्षाने या मतदार संघासाठी मोठ्या प्रमाणात निधी दिला असून, शिराळा विधानसभा मतदार संघाचा आमदार हा भारतीय जनता पक्षाचा असेल, असे प्रतिपादन भाजपा नेते, जिल्हा बँक संचालक सत्यजित देशमुख यांनी केले.
नवी मुंबई येथे शिराळा विधानसभा मतदारसंघातील मुंबई स्थित कार्यकर्ते चा स्नेह मेळावा पार पडला.
यावेळी भाजपा नेते सम्राट महाडिक, माजी जिल्हा परिषद के.डी.पाटील, शिवाजीराव जाधव, भिमराव पाटील, हिंदुराव बसरे, सरपंच आनंदा कुंभार, विजय झिमूर, संजय गांधी निराधार योजनेचे अध्यक्ष केदार नलावडे, अनिकेत देशमुख, आनंदा जाधव आदी प्रमुख मान्यवर उपस्थित होते.
यावेळी बोलताना सत्यजित देशमुख म्हणाले कि, शिराळा विधानसभा मतदारसंघातील कार्यकर्त्यांना बळ देण्याचे काम भारतीय जनता पक्षाच्या माध्यमातून होत आहे. या विधानसभा मतदारसंघातील विकास कामांसाठी मोठ्या प्रमाणात निधी शासनाच्या माध्यमातून उपलब्ध झालेला आहे. वाकुर्डे बुद्रुक योजनेला भाजपा सरकारच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात निधी मिळाला असून, योजनेचे काम प्रगतीपथावर आहे. या योजनेमुळे बहुतांशी क्षेत्र पाण्याखाली येत आहे. परंतु अद्यापही काही क्षेत्र पाण्यापासून वंचित रहात आहे. हे क्षेत्र ओलिताखाली आणण्यासाठी प्रयत्न करू. मुंबई मधील राहणाऱ्या लोकांचे प्रश्न व समस्या सोडवण्यासाठी प्रयत्न करू अशी ग्वाही देशमुख यांनी दिली.
यावेळी बोलताना सम्राट माडीक म्हणाले कि, एक विचार घेऊन आपण सर्व मंडळी एकत्र काम करत आहोत. वाकुर्डे सह उत्तर विभागातील असणाऱ्या लोकांचे प्रश्न समस्या सोडवण्यासाठी प्रयत्नशील आहे. यावेळी संदीप कदम, राहुल गायकवाड, वसंत शेटके, गुंगा शेटके, राजाराम जंगम, संगीता ताई शेटके, अशोक पाटील, पोपट जाधव, राजेंद्र मादळे, सुभाष वा, सुरेश माने, शशिकांत फिलमे, गोरख फिलमे, सुरेश वाघ, भारत पाटील, दिलीप माने, विकास पडवळ, आदी सह मान्यवर कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.