अवघी पंढरी दुदुमली…माउली, माउली …
बांबवडे : अवघी पंढरी वारकऱ्यांच्या विठूनामाच्या जयघोषाने दुमदुमली आहे. गेली पंधरा दिवस पांडुरंगाच्या भेटीसाठी वारकरी मंडळी आसुसली होती. आणि आज तो क्षण आला असून, आषाढी एकादशी च्या अनुषंगाने चंद्रभागेच्या तीरी वारकरी मंडळींची मांदियाळी गोळा झाली आहे.
सर्वसामान्यांचा पांडुरंग कटेवर हात ठेवून भक्तांचा हा सोहळा पाहत आहे. माउली , माउली, चा धावा विठुरायाच्या कानावर पडत आहे. आणि विठूराया आपल्या भक्तांसाठी धावून जात आहे. असा हा संगम चंद्रभागेच्या तीरी आपल्याला पाहायला मिळत आहे.
!! रामकृष्ण हरी !!