educationalसामाजिक

जीवन शिक्षण वि. मंदिर साळशी राज्यात ठरतेयं आदर्श …: एक नवा ” ब्रँड “


बांबवडे : महाराष्ट्र राज्यातील जिल्हा परिषदेच्या ३०० आदर्श शाळांमध्ये शाहुवाडी तालुक्यातील साळशी येथील जीवन शिक्षण विद्यामंदिर या शाळेची निवड करण्यात आली आहे. याबद्दल जिल्ह्यातील विविध स्तरावरून साळशी च्या या शाळेचे अभिनंदन करण्यात येत आहे.

Advt.


मार्च २०२० च्या अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये महाराष्ट्र शासनाने राज्यातील जिल्हा परिषदेच्या ३०० आदर्श शाळा विकसित करण्याचा निर्णय घेतला होता. यात अशा शाळांची निवड करण्यात आली आहे, कि, ज्या शाळांमध्ये भौतिक सुविधा , शैक्षणिक सुविधा व गुणवत्ता, तथा सर्व प्रशासकीय सोयी सुविधांनी परिपूर्ण असतील. अशा ३०० शाळांच्या यादीत शाहुवाडी तालुक्यातील जीवन शिक्षण विद्यामंदिर ,साळशी ,शाळेची ँप्राथमिक स्तरावर निवड करण्यात आली आहे. हि निवड केवळ तालुकाच नव्हे तर जिल्ह्याच्या दृष्टीने देखील भूषणावह बाब आहे.

Advt.


शारीरिक, मानसिक व बौद्धिक विकासाचा केंद्रबिंदू ठरलेली हि शाळा, विकसित करण्यासाठी अनेक शिल्पकारांचे श्रेय लाभले आहे. यामध्ये गटशिक्षणाधिकारी, शिक्षण विस्तार अधिकारी, केंद्रप्रमुख, शाळेच्या मुख्याध्यापिका, सर्व शिक्षकवृंद, शाळा व्यवस्थापन समिती, ग्रामपंचायत, ग्रामस्थ, तरुण मंडळे, आदी मान्यवरांचे प्रेरणा व प्रोत्साहन लाभले.
त्याचबरोबर या शाळेचे माजी विद्यार्थी ठरलेले जि.प. सदस्य विजयराव बोरगे ( पैलवान ), यांनी जि.प. फंडातून आकर्षक अंगण ( पेव्हिंग ब्लॉक ) , लॅपटॉप, खेळाचे साहित्य, सॅनिटायझर, मास्क, ई. साहित्य पुरवून आपली गुरुदक्षिणा त्यांनी दिली.

Advt.


माजी खासदार राजू शेट्टी यांनी भारत फोर्ज कंपनी मार्फत संरक्षक भिंती चा फंड उपलब्ध करून दिला. ग्रामपंचायत साळशी चे सरपंच संदीप पाटील, उपसरपंच , सर्व सदस्य यांच्या सहकार्यातून टी.व्ही. संच, रंगकाम, करण्यात आले. पालक, ग्रामस्थ यांच्या सहकार्याने शाळेला भौतिक सुविधांनी सुसज्ज , समृद्ध करण्यासाठी मोलाचे योगदान लाभले.
अशा अनेक वैशिष्ठ्यपूर्ण सोयी सुविधांनी सुसज्ज असणारी हि शाळा सर्व बाबींमध्ये आकर्षक ठरली आहे.
गेल्या चार, पाच वर्षातील आजी माजी सर्व शिक्षक व मुख्याध्यापक यांच्या कष्टातून व त्यागातून हे शाळेचे देखणे स्वरूप साकारले आहे. जीवन शिक्षण विद्यामंदिर साळशी एक ” ब्रँड ” बनली आहे.
या निवडी मध्ये माजी मुख्याध्यापिका सौ. विजया पाटील, सौ.जयश्री मगदूम, श्री. शंकर मगदूम, श्री. संजय शिंदे, श्रीम. कमल दिंडे, श्री. विष्णुपंत पाटील, सौ.अलका थोरात, श्री.संजय पाटील, श्री. सुरेश पाटील,श्री. पृथ्वीराज जाधव, हा सर्व शिक्षक वृंद, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष श्री. उत्तम मगदूम, व सर्व सदस्य, जि.प. सदस्य सर्वश्री. विजयराव बोरगे, सरपंच संदीप पाटील, उपसरपंच माजी दिलीप पाटील, विद्यमान उपसरपंच प्रकाश पाटील, केंद्रप्रमुख सदाशिव थोरात, शिक्षण विस्तार अधिकारी नंदकुमार शेळके, गटशिक्षणाधिकारी श्री उदयकुमार सरनाईक या सर्वांचे योगदान आहे. त्याचबरोबर या सर्वांचे तालुक्यातून अभिनंदन करण्यात येत आहे.

Mukund Pawar

Editor

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page

error: Content is protected !!