आमच्याबद्दल

सा. शाहुवाडी टाईम्स च एक पाऊल डीजीटल कडे

SPS NEWS 

एक ऑनलाईन न्यूज चॅनेल

सविनय नमस्कार ,

शाहुवाडी तालुक्यातील सह्याद्रीच्या  जन्मलेले सा.शाहुवाडी टाईम्स . गेली १८ वर्षे आपण सगळ्यांनीच जे बाळकडू सा.शाहुवाडी टाईम्सला दिलं. त्याबद्दल आपले शतशः आभार . ज्या जिव्हाळ्याने आणि आत्मीयतेने आपण आधार दिलात, ते अतुलनीय आहे. आज जगामध्ये डीजीटलायाजेशन होत आहे. अनेक वृत्तवाहिन्यांचा जन्म होत आहे. अशावेळी आपणही कुठे मागे राहू नये,असे आम्हाला वाटते. यासाठीच एक नवीन संकल्पना आपल्यासमोर मांडत आहे.

सा.शाहुवाडी टाईम्स हे प्रिंट मिडियामध्ये गणल जातं. त्यामुळे आपल्यापर्यंत पोहोचेपर्यंत बराचसा कालावधी व्यतीत होतो. यासाठी वेब पोर्टल नावाची संकल्पना आपल्यासमोर मांडत आहे. या वेब पोर्टलवरून आपण वृत्त्वाहीनिप्रमाणेच आमच्याशी जोडले जाऊ शकता. आपल्या कोल्हापूर जिल्ह्यातील बारा तालुक्यात आपण पोहचण्याचा मनोदय आहे. परंतु यासाठी दहा टप्पे ठरविले आहे. प्रत्येक टप्प्याला ३ तालुक्यात पसरण्याच नियोगेन आहे. या ३ तालुक्यातून आपण व्हिडीओ शुटींगने बातम्या गोळा करून दशकापर्यंत व्हाटस अपच्या माध्यमातून ठेवणार आहोत. दिवसातून ३ वेळा बुलेटिन आणि जाहिराती आपण व्हाटस अप वरून प्रसारित करणार आहोत. याचबरोबर ग्राहकांना इंटरनेटच्या खर्चाचा त्रास होऊ नये. यासाठी लिन्क देणार आहोत. यामधून ८० टक्के इंटरनेटचा खर्च वाचेल. आणि बात्म्यासाहित जाहिराती या आपल्याशी जोडल्या असलेल्या दर्शकापर्यंत प्रसारित केल्या जातील. यामध्ये आपण जगात कुठेह्ही असलात तरी आपल्या ग्रामीण भागाशी संपर्कात राहू शकता. त्याचबरोबर आपण ज्या ठिकाणी व्यवसाय करीत आहोत. त्याची माहिती आपल्या ग्रामीण भागापर्यंत मोजक्या मिनिटात पोहोचविली जाईल . अशी हि संकल्पना घेऊन आम्ही येत आहोत.

एका दुर्गम तालुक्यात तालुक्यात अठराविश्वे साप्ताहिक चालवीत असताना जगाच्या स्पर्धेत उतरण्यासाठी केलेला हा मानस आहे. आपला तालुका जगाच्या नकाशावर आपल्या वेबसाईटच्या माध्यमातून आपल स्थान निर्माण करणार आहे. जेणेकरून भविष्यात आपल्याला हक्काची वृत्तवाहिनी पहावयास मिळेल. आपण आजवर अनेक साधनांचा माध्यमातून स.शाहुवाडी टाईम्सला सहकार्य केल आहे. हे जिव्हाळ्याच नात जोपासलं आहे. त्यामुळेच हि हिमशिखाराकडे वाटचाल करण्याचं धाडस करीत आहोत. या वेब पोर्टल ला आपण सहकार्य करून त्याचा प्रसार जगाच्या नकाशावर करण्यासाठी सहकार्य कराल, अशीच अपेक्षा आहे.

धन्यवाद!

 

मुख्य कार्यालय : बांबवडे , Main Office : Bambawade,

ता.शाहुवाडी,जि.कोल्हापूर Tal.Shahuwadi,Dist.Kolhapur

संपर्क : ९९ २२ ९६ ५६०० Contact No : 99 22 96 5600

ई मेल :  [email protected] Email id : [email protected]

You cannot copy content of this page

error: Content is protected !!