सामाजिक

मटका, गांजा विरोधात बांबवडे ग्रामसभेत सर्वानुमते ठराव मंजूर 

बांबवडे : बांबवडे तालुका शाहुवाडी ग्रामपंचायत ची ग्रामसभा अवैध धंद्यांविरोधात ठराव करीत संपन्न झाली. या ग्रामसभेच्या अध्यक्षस्थानी लोकनियुक्त सरपंच भगतसिंग चौगुले हे होते..


सभेचे प्रास्ताविक ग्रामसेवक आर.बी.कुरणे यांनी केले.
यावेळी गावातील मोकाट सुरु असलेला मटका, तसेच खुलेआम होत असलेली गांजा विक्री,व अवैध दारू विक्री या अवैध धंद्याविरोधात सर्वानुमते ठराव करण्यात आला. याबाबत शाहुवाडी पोलीस ठाणे दुर्दैवाने अक्षम ठरले.

यामुळे हा ठराव ग्रामसभेत करण्यात आला. काही दिवसांपूर्वी एका मटक्याच्या चिठ्ठी घेणाऱ्या तरुणाने दिलेल्या फिर्यादीनुसार मारहाणीची तक्रार दाखल झाली. त्यावर कायद्यानुसार कारवाई देखील झाली. परंतु मटका घेणाऱ्या विरोधात मात्र काहीही कारवाई झाली नाही. सदरबाबत शाहुवाडी पोलीस ठाण्याकडे सर्व माहिती असूनसुद्धा कारवाई न करणे, याचा अर्थ सामान्य जनतेने काय लावायचा ? असा प्रश्न नागरीकातून उपस्थित केला जात आहे.


दरम्यान कृशिविभागाने सर्व माहिती शेतकऱ्यांना पुरवावी, असा आग्रह देखील ग्रामस्थातून धरल्यानंतर कृषी पर्यवेक्षक राबाडे यांनी शेतकऱ्यांना सर्व माहिती पुरविण्याचे आश्वासन दिले.

याचबरोबर आरोग्य विभागाने औषध साठा उपलब्ध करून ठेवावा, अशी मागणी ग्रामस्थांकडून करण्यात आली. यावेळी पर्यवेक्षक लोहार यांनी सदर बाबत प्रशासनाला कळविले असून,त्याबाबत शासन स्तरावर निर्णय घेतला जाईल.


यासह अनेक प्रश्न ग्रामसभेत उपस्थित करण्यात आले. या अनुषंगाने ग्रामसभा खेळीमेळीच्या वातावरणात संपन्न झाली. सभेचे आभार उपसरपंच स्वप्नील घोडे-पाटील यांनी मानले.

Mukund Pawar

Editor

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page

error: Content is protected !!