educationalसामाजिक

लोकनेते फत्तेसिंगराव नाईक प्राथमिक विद्यामंदिर चिखली शाळेत आठवडी बाजार संपन्न

शिराळा प्रतिनिधी : लोकनेते फत्तेसिंगराव नाईक प्राथमिक विद्यामंदिर चिखली शाळेत विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकासाच्या दृष्टीने शैक्षणिक वर्षात अनेक उपक्रम राबवले जातात विद्यार्थी हा शिक्षण व्यवस्थेचा केंद्रबिंदू आहे.
त्याचा सर्वांगीण विकास व्हावा हाच मुख्य उद्देश समोर ठेवून आमच्या शाळेत शालेय व सहशालेय उपक्रमाचे आयोजन करून ते शाळा स्तरावर उत्तम रीतीने पार पाडले जातात
या अनेक विविध उपक्रमापैकी एक म्हणजे आठवडी बाजार हा उपक्रम होय.


शनिवार दिनांक १६ डिसेंबर २०२३ रोजी सकाळी ९ ते ११.३० या वेळेत हा आठवडी बाजार अतिशय आनंदात व वैविध्यरित्या संपन्न झाला
प्रथमतः शाळेच्या ग्राउंडवर विद्यार्थ्यांनी आणलेल्या वस्तूंची मांडणी करून घेतली. भाजीपाला, किराणा, फास्टफूड आणि मनोरंजक खेळ असे भाग करून वेगवेगळे प्लॅटफॉर्म तयार केले. शाळेचे पालक प्रतिनिधी श्री मोहन यादव सर यांच्या हस्ते उद्घाटन करून, बाजाराचे व्यवहार शुभारंभ करण्यात आला. अनेक विद्यार्थ्यांनी विक्रीसाठी वेगवेगळ्या वस्तू आणल्या होत्या.


भेळ ,पाणीपुरी, पावभाजी, कचोरी, समोसा, इडली, वडापाव, सरबत, चहा, उसाचा रस, चॉकलेट, बिस्किट, कोबी, कोथिंबीर, लिंबू, भाज्या इत्यादी आमच्या शाळेतील सर्व विद्यार्थी व शिक्षक तसेच विश्वास विद्यानिकेतन व ज्युनिअर कॉलेजच्या विद्यार्थ्यांनी व शिक्षकांनी खरेदीचा मनमुराद आनंद घेतला.
वास्तविक पाहता विद्यार्थ्यांना व्यावहारिक शाळा कौशल्य पैशाचे व्यवहार, स्वावलंबन श्रमाचे मूल्य, कष्टाची सवय व आत्मविश्वास या बरोबरच आनंद मिळवणे. या गोष्टीचे धडे विद्यार्थी स्वतः घेत असल्याचे दिसून आले. यावेळी संस्थेचे अध्यक्ष आदरणीय अमरसिंह नाईक( पापा )यांनी स्वतः आठवडी बाजार या उपक्रमाला भेट दिली. विद्यार्थ्यांची हितगुण साधले.
विद्यार्थ्यांना प्रेरणा दिल्या, व त्यांचे कौतुक केले. तसेच शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष श्री पांडुरंग चौगुले (तात्या) नागराळकर सर, वरेकर सर, रेक्टर पाटील सर व विद्यानिकेतन चा सर्व स्टाफ या ठिकाणी उपस्थित होता.
हा उपक्रम पार पाडण्यासाठी शाळेचे मुख्याध्यापक डी.पी. गवळी सर तसेच सर्व पालक व शिक्षकांकडून सहकार्य लाभले. एकंदरीत भविष्यातील वाटचालीस आत्मविश्वास, जिज्ञासा, सर्जनशीलता नाविन्यपूर्णता या मूल्यांच्या संवर्धनासाठी संधी देण्याचे काम या उपक्रमातून दिसून येत असते.
सहभागी विद्यार्थी या संधीचे सोनं करून आयुष्याची शिदोरी जतन करून ठेवण्याचे काम करीत असतो

Mukund Pawar

Editor

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page

error: Content is protected !!