गुन्हे विश्वसामाजिक

आनंद हॉस्पिटल वर सापळा रचून कारवाई : रात्री उशीर पर्यंत कारवाई सुरु

बांबवडे : बांबवडे तालुका शाहुवाडी येथील आनंद हॉस्पिटल वर सापळा रचून कारवाई करण्यात आली आहे. याबाबत तपासीय अधिकारी माहिती देण्यास उशीर करीत असल्याचे निदर्शनास आले.
याबाबत घटनास्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार, आनंद हॉस्पिटल मध्ये बेकायदेशीर गर्भपात होत असल्याची माहिती समजल्याने शासकीय अधिकाऱ्यांनी डमी पेशंट तयार करून, हॉस्पिटल मध्ये पाठवले. गर्भपात करण्यासाठी सुमारे वीस हजार रुपये मागण्यात आले. व ते देण्यासाठी डमी पेशंट आले व त्यांनी ती रक्कम डॉक्टर नाईक यांना दिली. या कारणावरून त्यांच्यावर कारवाई करण्यात आली असल्याचे समजते.
हि कारवाई सीपीआर हॉस्पिटल च्या सिव्हील सर्जन डॉ. सुप्रिया देशमुख, डॉ.हर्षला वेदक निवासी वैद्यकीय अधिकारी, डॉ. सुनंदा गायकवाड अधीक्षक ग्रामीण रुग्णालय मलकापूर, डॉ. एच. आर. निरंकारी तालुका वैद्यकीय अधिकारी तसेच कोल्हापूर येथील सामाजिक कार्यकर्त्या गीता हसुरकर यांनी संयुक्तरीत्या कारवाई केल्याचे समजते.
याबाबत रात्री उशीरपर्यंत कारवाई सुरु होती.

Mukund Pawar

Editor

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page

error: Content is protected !!