राजकीयसामाजिक

शिवसेनेच्या वतीने शाहुवाडी चे सत्यजित आबा यांना उमेदवारी ?

 

बांबवडे : हातकणंगले लोकसभा मतदार संघातून शिवसेना उद्धव ठाकरे यांच्या वतीने सरूड तालुका शाहुवाडी येथील शिवसेने चे माजी आमदार सत्यजित पाटील ( आबा ) यांना उमेदवारी मिळण्याचे निश्चित होत असल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे. तर या जागेसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे सर्वेसर्वा माजी खासदार राजू शेट्टी यांना उमेदवारी मिळणार असे संकेत येत असताना, सत्यजित पाटील यांच्या उमेदवारीचे नवे संकेत मिळू लागले आहेत.


राजू शेट्टी यांनी मागील काळात शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना भेटून पाठिंब्याची मागणी केली होती. त्यावेळी शिवसेनेकडून ” मशाल ” चिन्हावर निवडणूक लढवण्याची अट घातली होती. दरम्यान ती अट शेट्टी यांना मान्य नसल्याने शिवसेना स्वत:चा उमेदवार देण्याच्या निर्णयाप्रत आला आहे. असे समजते.

एकंदरीत सध्याचे चित्र जर खरे निघाले तर, इथे तिरंगी लढत अपेक्षित आहे. शिवसेना शिंदे गटाने विद्यमान खासदार धैर्यशील माने यांना उमेदवारी जाहीर केली असून, शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे सत्यजित पाटील, तर अपक्ष म्हणून माजी खासदार राजू शेट्टी रिंगणात उतरणार असल्याचे चित्र स्पष्ट होवू लागले आहे. यामध्ये उमेदवारांची क्षमता देखील तुल्यबळ आहे. माजी खासदार राजू शेट्टी यांनी कोरोना काळात जनतेसाठी मोठे योगदान दिले आहे. तसेच पुराच्या विळख्यात असताना देखील त्यांनी सर्व सामान्य जनतेला मदतीचा हात दिला आहे. शेतकऱ्याच्या पाठीशी ते नेहमीच सह्याद्रीसम उभे असलेले या मतदारसंघाने पाहिलेले आहे. माजी आमदार सत्यजित पाटील यांनी आपल्या आमदारकीच्या माध्यमातून जनसहभाग वाढवलेला आहे. परंतु सध्या लोकसभेची निवडणूक आहे. हे शिवधनुष्य पेलण्यासाठी शिवसैनिक मोठ्या ताकदीने उभे आहेत. तसेच महाविकास आघाडी च्या माध्यमातून शिराळा, वाळवा, शिरोळ हे तालुके पादाक्रांत करता येतील. शाहुवाडी आणि पन्हाळा हे दोन तालुके स्थानिक उमेदवार म्हणून पाठीशी राहिल्यास इतर तालुक्यांसह मतदारसंघाचा विकास जवळ येईल, अशी जनतेची भावना आहे. तसेच ज्या जनतेने शिवसेनेच्या नावावर खासदार धैर्यशील माने यांना मते दिली असताना, त्यांनी मात्र शिंदे गटासोबत जावून जनतेचा विश्वास गमावला असल्याचे चित्र दिसत आहे. तरीसुद्धा तालुक्यात एमआयडीसी आणण्यासाठी त्यांनी प्रयत्न केले असून, भविष्यात तेदेखील महायुतीच्या माध्यमातून निवडणुकीला सामोरे जात आहेत. याचबरोबर कलाकार मानधन, पर्यटन स्थळ यासारखी संकल्पना शाहुवाडी त राबविण्यासाठी त्यांचे प्रयत्न होते.
एकंदरीत शिवसेना उद्धव ठाकरे गटाने जर सत्यजित पाटील यांची उमेदवारी जाहीर केली तर मात्र सगळ्यांनाच हि निवडणूक जीकरीची होणार आहे.

दरम्यान राजू शेट्टी हे शेतकरी कुटुंबांच्या माध्यमातून जनतेसमोर निवडणुकीसाठी येवू शकतात.असो. येत्या चार दिवसात मतदारसंघाचे चित्र स्पष्ट झाल्यानंतर उमेदवारांची रणनीती पहावयास मिळेल.

Mukund Pawar

Editor

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page

error: Content is protected !!