… अन्यथा शाहुवाडी तालुका बंद चा इशारा – हिंदुत्ववादी संघटना
मलकापूर प्रतिनिधी : शाहुवाडी तालुक्यातील एका युवकाने सोशल मिडीयावर आक्षेपार्ह संदेश टाकल्या संदर्भात एकास अटक करण्यात आली आहे. त्या अनुषंगाने मलकापूर इथं चोख बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. दरम्यान मलकापूर येथील हिंदुत्ववादी संघटनांनी संदर्भीय मंडळींना अटक करून कडक कारवाई करावी, अशा आशयाचे निवेदन शाहुवाडी पोलिसांना दिले आहे.

याबाबत सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार उचत तालुका शाहुवाडी येथील एका युवकाने दोन समाजात धार्मिक तेढ निर्माण होईल, अशा आशयाचा मजकूर सोशल मिडीयावर पसरविला. हि घटना सोमवार दि.१२ जून २०२३ रोजी रात्री उशिरा घडली. यामुळे मलकापूर नागरी मध्ये तणाव निर्माण झाला. त्यामुळे सर्व हिंदुत्ववादी संघटनांनी एकत्र येत मलकापूर इथं सदर घटनेचा निषेध केला. तसेच संदर्भीय व्यक्तींना अटक करून कडक कारवाई करावी, अशा आशयाचे निवेदन शाहुवाडी पोलिसांना दिले आहे. तसेच तालुक्यातील सर्व मदरशांची सखोल चौकशी करावी, अशी मागणी देखील या निवेदनात करण्यात आली आहे.

यावेळी बोलताना प्रवीण प्रभावळकर म्हणाले कि, समाजात सलोखा व शांतता कायम राहावी, यासाठी सर्व हिंदू समाज बांधव सहकार्य करीत आहेत. दरम्यान कोणतरी हि शांतता बिघडवण्याचा प्रयत्न करीत आहे. अशा लोकांना तातडीनं अटक करून, कारवाई करावी, अन्यथा याच्या निषेधार्थ शाहुवाडी तालुका बंद करण्यात येईल, असा इशारा देखील यावेळी देण्यात आला.

सदर निवेदनावर प्रवीण प्रभावळकर, युवराज काटकर, महेश विभूते, दिनेश पडवळ आदी मान्यवरांच्या स्वाक्षऱ्या आहेत.