उदंड आयुष्याच्या अनंत शुभेच्छा- : श्री संतोषराव झंजाड
बांबवडे : माणसाच्या आयुष्यात अनेक अडचणी असतात. तरीसुद्धा या अडचणींवर मात करीत जीवन हसत, हसत जगावं, हे या नवतरुणा ने स्वत:च्या कुटुंबासहित पाहुण्यांना सुद्धा आपल्या कृतीतून दाखवून दिले आहे. ते आहेत आमचे भाचे श्री संतोषराव काशिनाथ झंजाड . आज त्यांचा ३४ वा वाढदिवस संपन्न होत आहे. याच अनुषंगाने त्यांना सौ/ श्री मंजिरी मुकुंद पवार आणि परिवार यांच्यावतीने उदंड आयुष्याच्या अनंत शुभेच्छा दिल्या आहेत.
त्यांच्या या वाढदिवसानिमित्त त्यांच्या व्यक्तिमत्वावर टाकलेला एक प्रकाशझोत.

आयुष्यात अनेक संघर्षाचे प्रसंग येत असतात. परंतु त्यावर उत्तर असतंच , कोणताही प्रश्न उत्तराशिवाय नसतोच. हे संतोष कडून पहायला मिळतं. फक्त उत्तर लवकर शोधायचं असतं, नाहीतर प्रश्न गंभीर बनतात. हे त्याच्या व्यक्तीमत्वातून दिसतं. असं हे छोटंस कुटुंब आहे. या कुटुंबात सगळ्यांना थक्क करून सोडणारी एक परी आहे. म्हणजेच त्यांची मुलगी ” आरल “. हिला चार भाषा समजतात, आणि बोलताही येतात. असं हे संस्कारक्षम कुटुंब नेहमीच सगळ्यांची काळजी करतं. संतोष वर सुद्धा त्यांच्या आई सौ कांता यांनी चांगले संस्कार केले.यामुळेच हे छोटसं रोपटं आता वृक्षात रुपांतरीत होताना दिसत आहे.

संतोषराव अगदी लहानपणापासून चौकस बुद्धीचे आहेत. ते उच्च पदवीधर असूनही, त्यांनी नोकरी न करता, आपल्या आई सौ. कांता काशिनाथ झंजाड यांचा कॉम्प्यूटर क्लास पुढे सुरु ठेवला. परंतु त्यामध्ये अनेक आधुनिक बदल घडवून,त्यांनी आपला व्यवसाय नावारूपाला आणला. सध्या ते महाराष्ट्र राज्य कॉम्प्यूटर प्रशिक्षण संस्था,संघटनेचे प्रसिद्धीप्रमुख आहेत.
स्वत: आर्थिक आत्मनिर्भर बनले. नेहमीच स्वत:बरोबर दुसऱ्याची काळजी करणारी हि व्यक्ती, प्रत्येक पाहुणे मंडळींसाठी सुद्धा त्यांच्या घरात मानाचं स्थान मिळवून आहे. त्यांच्या या प्रवासात त्यांना त्यांची पत्नी सौ.निधी यासुद्धा सहकार्य करतात.


आज या व्यक्तिमत्वाचा वाढदिवस निश्चितच प्रत्येकाच्या लक्षात असणारंच. कारण अडचण कोणतीही असली तरी संतोष त्यातून मार्ग काढतात. हा दृढविश्वास सगळ्या नातेवाईकांना आहे. म्हणूनच आज पुनश्च त्यांना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा.