कार्यकर्त्याचा हेतू शुद्ध व नियत साफ असली कि, प्रश्न नक्की सुटतील – माजी खासदार राजू शेट्टी
मलकापूर प्रतिनिधी : संघटनात्मक काम करताना, तुमचा हेतू शुद्ध व नियत साफ असल्यास, कोणताही कठीण प्रश्न सुटल्याशिवाय रहात नाही. फक्त कार्यकर्त्यांच्या पायातील पायताण घट्ट असले पाहिजे, असे मत माजी खासदार राजू शेट्टी यांनी व्यक्त केले.

शाहुवाडी तालुका स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने अनुस्कुरा तालुका शाहुवाडी इथं शेतकरी मेळावा संपन्न झाला. शेतकऱ्यांच्या अडी-अडचणी जाणून घेण्यासाठी, त्यांचे प्रश्न समजून घेण्यासाठी या मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते.

यावेळी बोलताना राजू शेट्टी पुढे म्हणाले कि, आपण आपल्या प्रश्नांकडे गांभीर्याने पाहत नाही. संघटनात्मक काम न केल्यामुळे आपले प्रश्न सुटत नाहीत. संघटनात्मक काम शुद्ध हेतुने केल्यास निश्चित प्रश्न सुटतात, असे देखील राजू शेट्टी यांनी यावेळी सांगितले.

यावेळी स्वाभिमानी संघटनेचे तालुका अध्यक्ष सुरेश म्हाऊटकर, विजय पाटील, संजय पोवार, युवराज पाटील यांनी आपली मनोगते व्यक्त केलीत.

यावेळी संजय पोवार करंजफेण, हरिश्चंद्र कांबळे मोसम यांनी स्वाभिमानी शेतकरी संघटनेमध्ये प्रवेश केला.

अजित साळोखे, गुरुनाथ शिंदे, संजय केळसकर, बाजीराव सुळेकर, रंगराव चिले, अर्जुन पाटील, काशिनाथ नारकर महाराज, उपसरपंच दीपक पाटील, राजाराम शिवगण, राजाराम कातळे, काशिनाथ पाटील, अजित काटकर या मान्यवरांसह शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.