कास्य पदक जिंकून भगवा फडकवला
: बांबवडे तालुका शाहुवाडी येथील विक्रम पाटील यांचे चिरंजीव साईवर्धन विक्रम पाटील यांनी चेन्नई इथे जावून गोळाफेक स्पर्धेत कास्य पदक पटकावले आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंती दिवशी साईवर्धन यांनी महाराष्ट्राचा भगवा चेन्नई मध्ये फडकवला असून, यानिमित्त साप्ताहिक शाहुवाडी टाईम्स व एसपीस न्यूज च्या वतीने त्यांचे हार्दिक अभिनंदन.
चेन्नई इथं २३ राष्ट्रीय स्तरावरील पॅरा अॅथलेटिक चॅम्पियनशिप स्पर्धा संपन्न झाली. या स्पर्धेत शाहुवाडी तालुक्यातील बांबवडे मधील या युवकाने छत्रपतींच्या पदस्पर्शाने पुनीत झालेल्या मातीचा या यशाने गौरव केला आहे. इतिहासात आजही म्हटलं जातं कि, या मातीतून गवतालाही भले फुटतात. त्याच पद्धतीने साईवर्धन यांनी यश प्राप्त केले आहे.
सध्या ते आझम कँपस पुणे इथं पॅरीस ऑलिम्पिक वीर, व राष्ट्रपती अर्जुन पुरस्कार प्राप्त श्री सचिन खिलारी यांच्या मार्गदर्शनाखाली सराव करीत आहे. त्याला त्यांचे आई वडील श्री विक्रम पाटील, तसेच माजी जि.प.सदस्य श्री विजय बोरगे यांचे त्यांना मार्गदर्शन लाभले आहे.