बांबवडे इथं युवकाची गळफास लावून आत्महत्या
बांबवडे : बांबवडे तालुका शाहुवाडी इथं उदय साखर रोड जवळ टेक नावाच्या शेतात युवकाने सकाळी ९ ते १० वाजण्याच्या दरम्यान झाडाला गळफास घेवून आत्महत्त्या केली. लक्ष्मण बाबुराव निकम ( वय ३५ वर्षे ) असे युवकाचे नाव आहे. सदर घटनेची त्याचे वडील बाबुराव आनंद निकम यांनी शाहुवाडी पोलीस ठाण्यात नोंद केली आहे. सदर चा युवक बांबवडे तलाव जवळ सर्व्हिसिंग सेंटर चालवीत होता. तसेच ट्रॅक्टर व्यवसाय देखील करीत होता. आत्महत्येचे करण अद्याप समजू शकले नाही.
दरम्यान त्याच्या पश्चात आई-वडील, पत्नी लहान मुलगा, तसेच भाऊ व वाहिनी असा मोठा परिवार आहे. रक्षाविसर्जन विधी मंगळवार दि.२९ एप्रिल २०२५ रोजी सकाळी ९.३० वा. आहे.